हवेली – तलाठीसाठी पैसे घेणारा ACB चा आरोपी पुन्हा त्याच तलाठी कार्यालयात सक्रिय…तहसीलदार कार्यालय, सर्कल, तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांकडून कागदपत्रांसाठी पैसे खाणारे खाजगी भस्मासुरांचा सुळसुळाट; कारवाईचा “किरण” उगवण्याची गरज…पहा व्हिडिओ…
तलाठ्यासाठी पैसे स्वीकारणारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा आरोपी तुषार गलांडे इसम तलाठी कार्यालयात पुन्हा सक्रिय महसूल विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर...

पुणे (हवेली) : कोंढवा तलाठी कार्यालय येथे बनावट सातबारा प्रकरणी गुन्हा दाखल झालेले प्रकरण ताजे असतानाच फुरसुंगी कार्यालयातील हा प्रकार पुन्हा घडल्यामुळे महसुली विभागाची प्रतिमा पूर्णपणे मलिन झालेली आहे.
हवेली तालुक्यामध्ये कार्यालय प्रमुख तत्कालीन तहसीलदार यांचे कार्यक्षेत्रातील तलाठी व मंडल अधिकारी यांच्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत असल्या कारणाने त्यांच्यावर पुणे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी काय कारवाई करणार हे येणाऱ्या काळात जनतेला दिसणार आहे.
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचा आरोपी तलाठी यांच्या सेवेत..
फुरसुंगी तलाठी कार्यालय येथे फेरफार व सातबाराचे नोंद करण्यासाठी तलाठ्यासाठी पाच हजार रुपयाची लाच घेताना तलाठ्यांच्या खाजगी एजंट तुषार गलांडे या इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील एक महिन्यापूर्वी ताब्यात घेतले होते. तसा गुन्हा दाखल झाला होता. हवेली तालुक्यातील फुरसुंगी तलाठी कार्यालयात हा गुन्हा १५ तारखेला झालेला होता. तुषार मारुती गलांडे या खाजगी इसमाचे नाव होते. गुन्हा दाखल होऊन जवळपास एक महिना झाला परंतु तुषार गलांडे हा इसमाची एवढी हिम्मत कि तलाठी कार्यालयात पुन्हा तलाठ्याच्या दिमतीला हजर झाला. तसा सुत्रामार्फत १७/४/२०२५ रोजी व्हिडिओ मिळाला आहे.
तलाठ्यासाठी सातबारा फेरफार नोंदणी करणे पाच हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सापडणारा तुषार गलांडे हा पुन्हा फुरसुंगी तलाठी कार्यालय येथे खाजगी कॅंडिडेट म्हणून काम करत असल्या कारणाने संबंधित सातबारा नोंदणीचे पैसे हे तलाठी यांच्यासाठीच घेतले होते का? असा दाट संशय फुरसुंगी गावांमधील नागरिक चर्चा करताना दिसून येत आहेत.
फुरसुंगी तलाठी कार्यालयामध्ये गुन्हा दाखल होऊन ही संबंधित आरोपी गलांडे याला पुन्हा कार्यालयात कामाला ठेवल्याने महसूल विभागाची प्रतिमा म्हणून मलिन होताना दिसत असून या बाबत अधिकारी यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता खालील प्रमाणे प्रतिक्रिया…
यशवंत माने.
उपविभागीय अधिकारी तथा प्रांत हवेली,पुणे.
तसे काही असल्यास तलाठी यांना समज देण्याची कारवाई करण्यात येईल. तसे आम्ही लेखी देण्याची व्यवस्था करु…
किरण सुरवसे, तहसीलदार हवेली कार्यालय
संपर्क साधला असता फोन उचलत नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया घेता आली नाही.
सचिन आखाडे.
महसूल नायब तहसीलदार
प्रतिक्रिया बर, हे आपण सांगत आहात हे तुमच्याकडून समजत आहे. काहीतरी कामानिमित्त गलांडे आला असेल मी विचारतो मला वाटत नाही तसे काही असेल, (तू कुठला पत्रकार आहे.) मी तसे काय सांगू नेमके काय झाले ते पाहतो. खात्री करतो.
चौधरी, ग्राम महसूल अधिकारी, फुरसुंगी, हवेली
पहिला फोन – रुजू केले नाही. चुकीची माहिती दिली आहे आपल्याला (व्हिडिओ आहे) असे म्हटल्यावर पलटी मारून — तशा सूचना तुषार गलांडे यांना दिल्या आहेत. सातबारा काढण्यासाठी आले होते. ते आज आल्यानंतर मी तोंडी सूचना दिल्या की ऑफिसला बसू नका.
हवेली तालुक्यातील फुरसुंगी तलाठी महोदय यांचा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न. ..
आलेला दुसरा फोन – सातबारा नंबर लिहून दिले होते ते काढण्यासाठी आले होते. (कुठलीही शेती नसताना सातबारा कोणाचा काढायचा) असा प्रश्न प्रतिक्रिया घेताना विचारला असता पुन्हा पलटी मारुन — ते चुकीचेच आहे. गलांडे यांना बसता येणार नाही. तशा सूचना दिल्या आहेत. हे व्हायरल करू नका. काय होते. काय की चुकीचा मेसेज जातो. तोंडी समज दिली आहे. आपल्याला सोमवारी भेटतो असे फोनवरून सांगितले मिटवून घेऊ वायरल करू नका अशी प्रतिक्रिया दिली.



