
पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची (एसएससी बोर्ड) मान्यता घेऊन शाळा चालविणार्या लोहगावमधील एका शिक्षण संस्थेच्या शाळेत सीबीएसई अभ्यासक्रमच शिकविले जात असल्याचे उघडकीस आले आहे.
चौकशीसाठी जिल्हा परिषदेने समिती नेमली आहे. अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
लोहगावच्या शिक्षण संस्थेची चौकशी करण्याबाबत एका समितीची नियुक्ती करण्यात आली. त्या समितीचा अहवाल आल्यानंतर त्या संस्थेविरोधात काय कारवाई करायची, याबाबत निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
अशा शिक्षण संस्थांची झाडाझडती घेण्यासाठी लवकरच त्यांची तपासणी केली जाणार आहे. शिक्षण मंडळाची मान्यता असलेल्या शाळा सीबीएसई बोर्डाचे अभ्यासक्रम शिकवत असल्याचे समोर आले आहे. त्याद्वारे पालकांची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे.
लोहगावमधील एका संस्थेच्या शाळेला एसएससी बोर्डाची मान्यता आहे. तसेच, सीबीएसई बोर्डाची मान्यता नाही. त्यामुळे त्या शाळेत पालकांनी सीबीएसई बोर्डासाठी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने केले आहे. सीबीएसई बोर्डाची जाहिरात करून पालकांना फसवणार्या शाळांवर कारवाईचा इशारा दिला आहे.
पुणे जिल्ह्यात आणखीन किती बोगस शाळा ?
पुणे शहर जिल्ह्यातील अनेक शाळांना राज्य शिक्षण मंडळाची मान्यता आहे. मात्र, त्यापैकी काही शाळा या सीबीएसई बोर्डाची जाहिरात करत आहेत. कोणत्याही शाळेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्या शाळेला कोणत्या बोर्डाची मान्यता आहे.
आणखीन शाळा यात अडकण्याची शक्यता..
त्या ठिकाणी कोणता अभ्यासक्रम शिकवला जातो, याची पालकांनी खातरजमा करावी. यापुढे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह हवेली, मुळशी, खेड तालुक्यांतील सर्व शाळांची विशेष पथक व क्षेत्रीय अधिकार्यांमार्फत मान्यता तपासली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.



