राजकीय

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणका, काहींना जिल्ह्याबाहेरचा रस्ता, पुणे अभिलेख विभागाच्या बदल्या…

संपादक सुनिल थोरात 

पुणे : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील हवेली भूमी अभिलेख कार्यालयाबाबत सक्त झाल्याने तातडीचे आदेश निघाले.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे याच्या कारवाईच्या धसक्याने भूमी अभिलेख पुणे विभागात बदल्यांच्या रुपाने कारवाई करण्यात आली. आणि एक प्रकारे महसूल विभाग भ्रष्ट कारभाराला आळा बसणार यात शंका नाही. असे म्हणायला सध्यातरी हरकत नाही. स्वच्छतेच्या दृष्टीने पहिले परफेक्ट पाऊल पडले आहे. भूमी अभिलेख पुणे विभागातील बदल्या समुपदेशनाने नुकत्याच समाधानकारक पार पडल्या आहेत.

हवेलीतील बदलीस पात्र असलेल्या भूकरमापकांना थेट पुणे जिल्ह्यांबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

तसेच या बदल्या कुठल्याही गैर मार्गाने झाल्या नाहीत तर या बदल्या महसूल विभागाने केल्याने नागरिकांनी व भूमी अभिलेख विभागातील कर्मचा-यांनीही समाधान व्यक्त केले आहे. हवेली व पुणे जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातील कारभाराचे राज्यात धिंडवडे निघाले होते. हे चित्र बदलण्यासाठीच महसूलमंत्र्यांनी वरिष्ठ अधिका-यांची खरडपट्टी करत कारभारात बदल करण्यासाठी कडक शब्दांत समज दिलेली होती. त्यामुळे वरिष्ठ अधिका-यांची पावले योग्य दिशेला पारदर्शकतेने पडू लागल्याचे बोलले जात आहे.

भूमी अभिलेख पुणे प्रदेशचे उपसंचालक राजेंद्र गोळे यांनी कर्मचा-यांच्या बदलीचा आदेश नुकताच जारी केला आहे. बदली आदेशात बदल करून घेण्यासाठी कोणात्याही कर्मचाऱ्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास संबधित कर्मचारी शिस्तभंग कारवाई करण्यास पात्र असल्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. बदली झालेल्या कर्मचा-यांना कार्यालयीन प्रमुखांनी तात्काळ कार्यमुक्त करावयाचे आहे. तसेच पदस्थापना केलेल्या कार्यालयात त्वरीत रुजू होण्याचे आदेश राजेंद्र गोळे यांनी दिले आहेत.

दरम्यान, हवेली भूमी अभिलेख कार्यालयातील बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांना थेट पुणे जिल्ह्यांबाहेरची हद्द दाखवली आहे. हवेली व पुणे जिल्हा भूमी अभिलेख अधिक्षक कार्यालयातील कारभार स्वच्छ करण्यासाठी थेट मंत्रालयातून सूचना असल्याने प्रशासनाने बदली प्रक्रियेत कमालीची खबरदारी घेतली होती. या निर्णयामुळे काही प्रमाणात चाप बसणार आहे. त्यामुळे मोजणी कार्यालयातील ‘कारभार’ आता तरी सुधारणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??