
संपादक सुनिल थोरात
पुणे (हवेली) : पुर्व हवेलीतील भारतीय जनता पार्टी, हवेली तालुका, व लोणी काळभोर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व हवेली परिसरातील युवक-युवती, स्त्री-पुरुषांसाठी भव्य रोजगार प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन यावेळी करण्यात आले असल्याची माहिती भाजपाचे हवेली तालुकाध्यक्ष गणेश चौधरी व लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी यावेळी दिली.
बुधवारी (ता.०४) ते रविवारी (ता.०८) सकाळी दहा ते सायंकाळी ५ वाजेपर्यत या मेळाव्याचे आयोजन क्रेयॉन्स प्री स्कूल, ईस्ट हेवन सोसायटी, एमआयटी कॉलेज समोर, कदमवाकवस्ती येथे करण्यात आले आहे.
हा मेळावा १० वी, १२ वी उत्तीर्ण, तर १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांसाठी असून, मेळाव्याच्या माध्यमातून त्यांना तीन महिने मोफत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नामांकित ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये नोकरीसाठी संधी ही उपलब्ध होणार आहे. यामध्ये १) इलेक्ट्रिक व्हेईकल सर्विस असिस्टंट, २) ऑटोमोटिव्ह क्वालिटी कंट्रोल असिस्टंट ३) ऑटोमोटिव्ह प्रॉडक्ट टेस्टिंग टेक्निशियन ४) इंडस्ट्री ४.० स्पेशालिस्ट या कोर्सचा समावेश आहे.
वरील सर्व कोर्सेस पूर्णपणे मोफत असून, प्रशिक्षणाचा कालावधी ३ महिने आहे. पहिली बॅच १६ जूनपासून सुरु होणार असून, लोणी काळभोर येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. दरम्यान, नोंदणीसाठी इच्छुकांनी 8983429001 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावाः
ऑनलाइन नोंदणीसाठी अधिकृत https://lms.kedman.in/portals/registratio n/browser/pune या लिंकवर फॉर्म भरावा. असे आवाहन यावेळी भाजपाचे हवेली तालुकाध्यक्ष गणेश चौधरी व लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



