माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दूधगंगा व इंदापूर महाविद्यालयात वृक्षारोपण, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा उपक्रम…

प्रतिनिधी डॉ. गजानन टिंगरे.
पुणे (इंदापूर) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदापूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या Alumni Association ( माजी विद्यार्थी संघटना )च्या वतीने या संघटनेचे अध्यक्ष तसेच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर येथील दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ इंदापूर तसेच इंदापूर महाविद्यालयात वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
इंडियन ख्रिसमस ट्री, इंडियन पाम ट्री , मधुमालती अशा पर्यावरणपूरक झाडांचे यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. इंदापूर महाविद्यालय दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने एक थीम घेऊन हा दिवस साजरा करते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व सदस्य यासाठी विशेष प्रयत्न करतात. One Nation -One Mission : End Plastic या सदराखाली 5 ते 10 जून या कालावधीमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य ॲड. मनोहर चौधरी, ॲड.गिरीश शहा, सुरेश मेहेर, मच्छिंद्र शेटे तसेच भूषण काळे, गोपीचंद गलांडे, रघुनाथ राऊत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे, उपप्राचार्य दत्तात्रय गोळे यावेळी उपस्थिती होते.



