शिक्षणसामाजिक

अण्णासाहेब मगर महाविद्यालच्या विद्यार्थ्यांची क्विक हिल फाउंडेशनच्या सायबर सिम्पोझियम ट्रेनिंग सेंटरला अभ्यास भेट, क्यूएचएफ एएएमएम क्लबची स्थापना…

सुनिल थोरात

पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अण्णासाहेब मगर महाविद्यालच्या संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांनी क्विक हिल फाउंडेशनच्या सायबर सिम्पोझियम ट्रेनिंग सेंटरला अभ्यास भेट दिली. या अभ्यासभेटीत क्लबचे अध्यक्ष तेजस दळवी, सचिव यश भराटे, अ‍ॅक्टिव्हिटी डायरेक्टर अवधूत मोरे, मीडिया डायरेक्टर आष्लेशा दामगुडे, तसेच मार्गदर्शक अध्यापिका मनिषा गाडेकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना क्विक हिल फाऊंडेशनच्या संचालिका अनुपमा काटकर मॅडम व प्रमुख अजय शिर्के सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी “सायबर सुरक्षेसाठी जागृती ” या उपक्रमामध्ये २००% योगदान देण्याचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि नवचैतन्य निर्माण केले.

क्विक हिल टीमच्या गायत्री केसकर मॅडम आणि इतर तज्ज्ञांनी सायबर सुरक्षेचे विविध पैलू उलगडत सायबर हल्ले, नेटवर्क सिक्युरिटी तंत्र, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता याविषयी सखोल माहिती व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके सादर केली. या सत्रामध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालयासोबत पुणे जिल्ह्यातील इतर ७ महाविद्यालयांतील विद्यार्थी व प्राध्यापकांनीही सहभाग नोंदवला. यामुळे एक शैक्षणिक संवादाचा उत्तम आदानप्रदान घडून आला. या कार्यक्रमात क्यूएचएफ एएएमएम क्लबची स्थापना करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे, डॉ. प्रशांत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. मनीषा जगदाळे यांनी या अभ्यास भेटीचे संयोजन केले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??