आरोग्यजिल्हामहाराष्ट्रसामाजिक

जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा ; लासुर्णे

पुणे (इंदापूर) : | २१ जून २०२५ जागतिक स्तरावर साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा परिषद शाळा लासुर्णे येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेने पार पडला. या विशेष दिवशी योग साधनेचे आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व ग्रामस्थांनी सामूहिक योगाभ्यास केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष मा. गजाननभाऊ वाकसे यांची उपस्थिती लाभली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा प्रियंका किशोर पारधे व विशेष उपस्थिती म्हणून पंचायत समिती, इंदापूर येथील विषयतज्ञ मा. नितीन साबळे सर यांनी मार्गदर्शन केले.

शाळेचे मुख्याध्यापक गणेश धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपशिक्षक संजय धापटे, राजेंद्र शिंदे, गणेश शिंदे, श्वेता धायगुडे, निलावती भोसले, उषा धापटे, तसेच अंगणवाडी सेविका विजया निंबाळकर व लता मुळीक यांनीही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.यावेळी किशोर पारधे, शेकलाल घोरपडे, रोहन पांढरे, पांडुरंग सुळ व पालक वर्ग उपस्थित होता.

कार्यक्रमामधे मोठ्या उत्साहात ज्ञानसाधना सायन्स ॲण्ड करिअर ॲकडमी च्या सर्व विद्यांर्थी व शिक्षक वर्गाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विविध योगासने, प्राणायाम, आणि ध्यान यांचा सराव केला. योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन कसे साधता येते याचे प्रात्यक्षिके देण्यात आली. गजाननभाऊ वाकसे यांनी आपल्या भाषणात योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन केले.

सर्व स्तरातून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांमध्ये योगाची संस्कृती निर्माण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

संपादक डॉ गजानन टिंगरे 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??