जिल्हामहाराष्ट्र

बांधकाम कामगार योजनेचा बाजार मांडलेल्या दलालावंर कारवाई करा : दत्ताभाऊ जगताप…

पुणे (इंदापूर):- लहुजी शक्ती सेना प्रदेश सचिव तथा पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ जगताप यांच्या वतीने कामगार मंत्री आकाश फुंडकर, कामगार आयुक्त मुंबई, कामगार उपायुक्त यांना इंदापूर तालुक्यासह संपूर्ण राज्यामध्ये बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर झालेल्या बांधकाम कामगार नोंदणी रद्द करण्याबाबत तसेच बांधकाम कामगार सुविधा केंद्र येथील नियमांचे पायमल्ली करणारे कर्मचारी याच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की,मागील काही वर्षापासून शासनाच्या वतीने असंघटित क्षेत्रातील कामगारांना लाभ देण्यासाठी अनेक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे या योजनांचा बऱ्याच प्रमाणात कामगार व त्याच्या पाल्यांना लाभ मिळत आहे. कामगार कल्याण महामंडळातर्फे योजनेचा लाभ घेण्यासाठी असंघटित क्षेत्रातील ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र लागते परंतु लाभासाठी इंदापूर तालुक्यात अनेक जण एकही दिवस बांधकामावर नसतानाही अनेक कंत्राटदाराने आर्थिक लोभापायी बांधकाम कामगाराच्या फॉर्मवर स्वाक्षरी दिलेल्या आहेत. यामुळे इंदापूर तालुक्यात बांधकाम कामगार झाल्याचे चित्र आहे.

 

लाभ मिळत असल्याने जे बांधकाम कामगार नाहीत असेही श्रीमंत धनदांडगे लोक लोभापाई योजनेचा अर्ज करून लाभघेत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात इंदापूर तालुक्यात अनेक एजंट सक्रिय झाल्याचे दिसत आहे या दलाल एजंट लोकांचे थेट संबंध इंदापूर तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र यांच्याशी असल्याने बोगस प्रमाणपत्र दाखल करून अनेकांना बांधकाम कामगार बनवली जात आहे. या अशा बोगस कामगारांमुळे खरे गरजवंत कामगार शासनाच्या योजनांपासून वंचित राहत आहे आणि बोगस कामगार मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत.

यामुळे इंदापूर तालुक्यातील कामगार कल्याण मंडळातर्फे योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशी करून बोगस प्रमाणपत्र दाखल करून जे बांधकाम कामगार बनले आहेत याच्या नोंदणी रद्द करण्यात यावी व ज्या कंत्राटदाराने दलाला मार्फत एकही दिवस कामावर न गेलेल्या श्रीमंत धनदांडगे लोकांना आर्थिक लाभाच्या योजनेसाठी बोगस प्रमाणपत्र दिले आहेत अशा कंत्राटदराची चौकशी करून लायसन रद्द करण्यात यावे.

तसेच इंदापूर तालुका बांधकाम सुविधा केंद्र ज्यांच्या मार्फत चालवले जाते त्या कंपनी/ एजेन्सीचे टेंडर रद्द करण्यात यावे अशा विविध मागणीचे निवेदन त्यांनी दिले आहे. आणि या वरती आपण लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा या विरोधात आम्ही मोठे जन आंदोलन उभा करू अशीही यावेळी दत्ताभाऊ जगताप यांनी सांगितले.

संपादक डॉ गजानन टिंगरे 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??