
पुणे (इंदापूर) : “भेटी लागी जीवा लागलीसे आस” वाट पाहे रात्रंदिवस पांडुरंगा तुझी आणि तो एकदाचा क्षण आम्ही त्याची वाट पाहत असतो तो पांडुरंग वारीचा क्षण आला आणि त्या अनुषंगाने पांडुरंगाच्या सेवेत असणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी भिगवण डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून अन्नदान करण्यात आले.
यावेळी भिगवण डॉक्टर असोसिएशनचे सदस्य डॉक्टर नलिनी खानावरे, डॉक्टर अस्मिता भरणे, डॉक्टर नूतन नगरे यामध्ये प्रत्यक्ष भिगवण येथून येऊन इंदापूर बारामती चौकात अन्नदानाचे श्रेष्ठ दान केले.
अन्न हे सर्वश्रेष्ठ दान या वक्तीतून श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्याना महाप्रसादाची सोय ही सालाबादप्रमाणे करत असतात.
यावर्षी पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मसालेभात, जिलेबी चे वाटप उत्साहात केले. या अन्नदानाने वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील जो आनंद पाहायला मिळाला तो पैशाने न घेणारा आनंद झाल्याची भावना यावेळी भिगवण डॉक्टर असोसिएशनचे सदस्य डॉक्टर नलिनी खानावरे, डॉक्टर अस्मिता भरणे, डॉक्टर नूतन नगरे यांनी सांगितले. खऱ्या अर्थाने आम्ही कृतर्थ झालो असल्याचे यावेळी बोलताना सांगितली.
भिगवण डॉक्टर असोसिएशनचे सदस्य डॉक्टर नलिनी खानावरे, डॉक्टर अस्मिता भरणे, डॉक्टर नूतन नगरे गेले २० वर्ष भिगवण शहरांमध्ये रुग्णसेवेसाठी वाहून घेतलेले असून ही सेवा करत असताना सामाजिक कार्याचे भान ठेवून आम्ही मोफत चेकअप कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प व स्त्री समस्या या विषयी शिबिरे नित्यनेमाने आयोजित करत असतात.
यावर्षीही समाजाची सेवा करायची या भावनेतून या वारीचा कुठेतरी छोटासा खारीचा वाटा उचलून हा छोटासा भाग होण्याचा प्रयत्नकेला असे सांगितले. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अन्नदान केल्याचे मनापासून समाधान वाट्याची भावना व्यक्त केली. अन्नदान केल्यानंतर आम्ही या वारकऱ्यांची सेवेचे व्रत घेऊन, जात आहोत पुढील वर्षीही अशीच सेवा घडो अशी मनोमन पांडुरंग चरणी प्रार्थना करत जड अंतकरणाने आम्ही भिगवण येथे जाणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
संपादक डॉ गजानन टिंगरे





