संपादक सुनिल थोरात
सातारा (शिरवळ) : पोलीस ठाणे हद्दीत एम.आय.डी.सी. असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आलेले कामगार कंपनीमध्ये व हॉटेलमध्ये कामास आलेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात आलेले कामगार भाड्याने घर घेवुन राहत आहेत. त्यांचेमध्ये पाकिस्तानी नागरीक, बाग्लांदेशी नागरीक, रोहिंग्या किंवा गुन्हे करुन कोणासही काही एक माहीती न देता शिरवळ मध्ये काम करुन भाड्याने राहत असणेची शक्यता नाकारता येत नाही.
तरी वरील कामगार व भाडेकरु यांची पडताळणी न केल्यास त्यांचे कडुन एम.आय.डी.सी मध्ये व शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत ते कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तरी शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व कंपनी व्यवस्थापन, कंपनी मालक, कॉन्ट्रॅक्टर व घर भाड्याने देणारे घर मालक, यांनी आपलेकडे कामास असलेले कामगार व घर भाड्याने देण्यापुर्वी भाडेकरूंची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच घर भाड्याने देताना रितसर रजिस्टर अॅग्रीमेंट करणे गरजेचे आहे. तरी यासर्व आवश्यक कायदेशिर बाबींची पुर्तता करणेस टाळाटाळ होत असल्याचे दिसत आहे. ही बाब गंभीर आहे.
आपलेकडील कामगारांचे, भाडेकरूंचे चारित्र्य पडताळणीची माहीती व घराबाबत रजिस्टर अॅग्रीमेट करुन त्याची प्रत पोलीस स्टेशनला व ग्रामपंचायतीकडे देणे आवश्यक आहे. जेणेकरुन पोलीस स्टेशन शिरवळ व संबंधीत ग्रामपंचायत यांना बाहेरुन शिरवळ मध्ये आलेल्या कामगारांची व भाडेकरूंची माहिती मिळेल.
तसेच कंपन्यांमध्ये चारित्र्य पडताळणी न करता कामगार कामावर ठेवल्यास तसेच घरमालकांनी आपले घर चारित्र्य पडताळणी न करता, तसेच रजिस्टर अॅग्रीमेंट न करता घर भाड्याने दिल्यास व त्यांचेकडुन काही अपराध घडल्यास किंवा ते पाकिस्तानी, बांग्लादेशी अथवा रोहींग्या असलेचे आढल्यास त्यास सर्वस्वी आपणास जबाबदार धरणेत येईल याची कृपया नोंद घ्यावी.
शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल/लॉज मालक व चालक यांनी विदेशी नागरीक आपलेकडे – राहणेस आल्यास तात्काळ पोलीस स्टेशन ला कळविणे व त्याबाबतचे ऑनलाईन कागदपत्रांची पुर्तता करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये हयगय झालेस आपले विरुद्ध अपराध दाखल होऊ शकतो. पोलीसांनी दिलेल्या नियमांचे पालन करुन सुरक्षेकामी पोलीसांना कंपनी प्रशासन, घरमालक व हॉटेल/लॉज चालक सहकार्य करावे असे जाहीर आवाहन शिरवळ पोलीस स्टेशन कडुन करणेत येत आहे.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा