सुनिल थोरात
पुणे (हवेली) : शनिवारी सुट्टीच्या दिवशी ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी आल्याने भाविकांनी अष्टविनायकांपैकी एक असलेल्या हवेली तालुक्यातील थेऊर येथील श्री चिंतामणीच्या दर्शनाला पहाटे पासून गर्दी केली होती. पहाटे पुजारी आगलावे बंधु यांच्या हस्ते श्रींची पूजा करण्यात आली. त्यानंतर चिंचवड देवस्थानच्या वतीने श्री चिंतामणीची महापूजा करण्यात आली.
यावेळी विश्वस्त केशव उमेश विद्वांस उपस्थित होते. सद्यस्थितीत अवकाळी पाऊस व तिव्र उन्हाचा खेळ चालू असल्याने भाविकांना त्रास न होता दर्शन घेणे सुखकर व्हावे यासाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे वतीने मंदिर प्रांगण आणि मंदिराबाहेर मांडव घालण्यात आला होता. तसेच दर्शनबारी व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

दुपारी देवस्थान तर्फे भाविकांना उपवासाची खिचडी वाटण्यात आली. सायंकाळी चिंतामणी भजनी मंडळ यांचे साथीने देवाची आळंदी येथील हभप पवन महाराज कानठाळे यांचे कीर्तन झाले, चंद्रोदयानंतर श्रींचा छबिना निघला त्यांनतर उपस्थित भाविकांना ग्रामस्थांतर्फे महाप्रसाद देण्यात आला. जास्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने देवस्थान तर्फे जादा सुरक्षा व्यवस्था करण्यात केली होती. ग्रामपंचायती तर्फे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. याचबरोबर लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी आवश्यक तेवढा बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे गणेश भक्तांना कसलीही अडचण आली नाही.
बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा