सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात UPI ट्रान्सफर केल्यास जाऊ शकते थेट तुरुंगात…

पुणे : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे गुन्हेगारांनी नवीन फसवणुकीचे मार्ग अवलंबले आहेत. रस्त्यावर किंवा सोशल मीडियावर कोणी “मला रोख रक्कम द्या, मी तुम्हाला UPI ने पैसे पाठवतो” अशी विनंती केली, तर ती तुमच्या दृष्टीने साधी मदत वाटू शकते. मात्र हीच कृती तुम्हाला थेट मनी लाँड्रिंगसारख्या गुन्ह्यात अडकवू शकते.
काय धोका आहे?
मनी लाँड्रिंग: अशा व्यवहारात गुन्हेगार अवैध पैशांचा मागमूस पुसण्यासाठी सामान्य नागरिकांचा वापर करतात. तुमच्या खात्यातून व्यवहार झाल्याने तुम्ही गुन्ह्यात सहकारी ठरू शकता.
बँक खाते गोठवले जाण्याची शक्यता: संशयास्पद व्यवहार आढळल्यास पोलीस किंवा बँक चौकशी करू शकतात. या वेळी तुमचे खाते सील केले जाऊ शकते.
बनावट ओळख: फसवे लोक बनावट नाव-ओळख वापरतात. ते पकडले नाहीत, तर कायदेशीर अडचणीत तुम्हीच सापडू शकता.
सोशल मीडियावर चर्चा…
या नव्या स्कॅमबाबत अनेक चार्टर्ड अकाउंटंट लोकांना सावध करत आहेत. त्यांच्या मते, लोक मदत करण्याच्या नादात नकळत गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. भविष्यात अशा व्यवहारांवर सरकार व बँका तपास सुरू केल्यास, संबंधित नागरिकांवर थेट कायदेशीर कारवाई होऊ शकते.
स्वतःचा बचाव कसा कराल?
👉🏻 अनोळखी व्यक्तीला UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करू नका.
👉🏻 रोख रक्कमेची गरज असल्यास बँक/एटीएमचा वापर करा.
👉🏻 अशा प्रकारे फसवणूक करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास त्वरित पोलीस किंवा सायबर सेलकडे तक्रार नोंदवा.
थोडीशी सावधगिरी = मोठा बचाव
फक्त क्षणिक मदतीसाठी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे तुम्हाला तुरुंगापर्यंत पोहोचवू शकते. त्यामुळे जागरूक रहा, सावध रहा आणि स्वतःसह समाजालाही या नव्या स्कॅमपासून वाचवा.
Editer sunil thorat




