क्राईम न्युज

२७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत…

डॉ गजानन टिंगरे / पुणे

पुणे (इंदापूर) : इंदापूर तालुक्यातील न्हावी गावामध्ये शेतीमालात अमली पदार्थ निर्मीतीसाठी विनापरवाना अफुची लागवड करणाऱ्या तिघांना वालचंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची चाळीस गोण्या बोंडासह अफुची झाडे हस्तगत करणेत करण्यात आली.

अमली पदार्थ निर्मितीसाठी विनापरवाना आफुची शेती करणारे १) रतन कुंडलिक मारकड वय ५० वर्षे, २) बाळु बाबुराव जाधव, वय ५४ वर्षे ३) कल्याण बाबुराव जाधव वय ६५ वर्षे तिघेही रा. न्हावी ता. इंदापूर जि. पुणे ताब्यात घेण्यात आले.

वालचंदनगर पोलीस स्टेशन कडून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटल्याप्रमाणे वालचंदनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करणेच्या उद्देशाने पेट्रोलिंग करत असताना शुक्रवार दि.२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस हवालदार स्वप्निल अहीवळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,मौजे न्हावी (ता. इंदापूर जि. पुणे) गावचे हद्दीत वरील १ व २ क्रमांकांच्या आरोपींनी त्यांच्या मालकीचे शेतात बेकायदेशीरपणे विनापरवाना अफुच्या झाडांची लागवड विक्री करणेच्या उद्देशाने उत्पादन घेतले आहे, अशी बातमी मिळाली.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वरील आरोपींच्या शेतामध्ये अफुची बेकायदेशीर विनापरवाना लागवड केल्याचे आढळून आले.अफुची लागवड केलेली दिसून येवू नये म्हणुन संबंधित आरोपींनी शेतात कांदा व लसून पिकांची लागवड करून चोहु बाजूने मका या पिकाचे उत्पादन घेण्यात आलेले होते. कारवाई दरम्यान एकूण २७ लाख ५६ हजार ४६० रूपये किंमतीची सुमारे ८८३ किलो ग्रॅम वजनाची बोंडासह अफुची झाडे हस्तगत करणेत आलेली असून संबधीत इसमांविरोधात वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६९ / २०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ब, १५, १८, ३२,४६ प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण,अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, बारामती विभागाचे डि.वाय.एस.पी सुदर्शन राठोड, यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, बारामती पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, वालचंदनगर स.पो.नि. राजकुमार डुणगे,स.पो.नी कुलदीप संकपाळ, स.पो.नि. राहुल गावडे, पोलीस अंमलदार स्वप्निल अहीवळे, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, अजय घुले, ईश्वर जाधव सह आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??