
पुणे (हवेली) : ओला-उबेर कॅब चालकांनी महाराष्ट्र कामगार सभेच्या आवाहनावरून पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा परिणाम केवळ पुणे शहरापुरता मर्यादित राहिला नाही, तर पूर्व हवेलीतील ग्रामीण भागालाही याचा मोठा फटका बसला. कदमवाकवस्ती परिसरात शांतपणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने अनेक प्रवासी कॅबच्या प्रतिक्षेत अडकून पडल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
संपामुळे कॅब उपलब्ध न झाल्याने काही ठिकाणी दुहेरी भाडे देऊनही गाडी मिळाली नाही. परिणामी, नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना यावेळी करावा लागला.
ओला-उबेर कंपन्यांच्या अन्यायकारक भाडे नियंत्रण धोरणाच्या विरोधातच हा संप पुकारण्यात आला असून, या आंदोलनात गांधीगिरीचा मार्ग स्वीकारत कॅबचालकांनी कदमवाकवस्ती, लोणी स्टेशन परिसरात शांततापूर्ण आंदोलन यावेळी केले.
या संपाचे नेतृत्व निलेश काळभोर यांनी केले असून, “ड्रायव्हरला न्याय मिळावा, यासाठी आम्ही अहिंसेच्या मार्गाने लढा देत आहोत,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
या आंदोलनात बघतोय रिक्षावाला फोरम महाराष्ट्र राज्य पुणे शहर उपाध्यक्ष निलेश काळभोर, लोणी काळभोर अध्यक्ष उमेश कुंभार, लोणी काळभोर उपाध्यक्ष सुरज घाडगे, लोणी काळभोर सरचिटणीस अमोल कांबळे, लोणी काळभोर संघटक संजय शिवमूर्ती यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
Editer sunil thorat



