क्राईम न्युज

४० लाख रुपये किंमतीचे इलेक्ट्रीकल स्क्रॅप साहित्य चोरी ; उरुळी देवाची

पुणे : अज्ञात चोरट्यांनी उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत शासनाचा स्क्रॅप चा माल विकत घेऊन ठेवलेले गोडाऊन फोडल्याची घटना शुक्रवार (७ फेब्रुवारी) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली असून या चोरीत ४० लाख रुपये किंमतीचे इलेक्ट्रीकल स्क्रॅप साहित्य चोरून नेले आहे. तर चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

याप्रकरणी नितीन कोठारी (वय ५१, मार्केटयार्ड पुणे) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ नितीन कोठारी हे व्यावसायिक असून त्यांचे उरुळी देवाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर २८६/१/६ येथे प्रणाम इंटरप्रायझेस या नावाने स्क्रॅप साहित्य ठेवण्याचे गोडावून आहे. यामध्ये शासनाकडून विकत घेतलेले इलेक्ट्रीकल स्क्रॅप, संगणक, मोबाईल व वायर इत्यादी लाखो रुपयांचे भंगाराचे साहित्य ठेवण्यात आले होते.
या गोडावूनच्या भिंतीचा पत्रा उचकटून, गोडावून मध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी ७ फेब्रुवारी रोजी त्यातील संगणक व मोबाईल मधील चांदीचे पार्ट, वायर मधील अल्युमिनियम धातू व तांब्याची तारा असा सुमारे ४० लाख रुपये किंमतीचे भंगार चोरून नेले आहे. पुढील तपास फुरसुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णु देशमुख करीत आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??