
मुंबई : इग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात सध्या 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यजमान इंग्लंड या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहेत. तर उभयसंघात 23 जुलैपासून चौथा कसोटी सामना हा मँचेस्टरमध्ये खेळवण्यात येत आहे.
या दरम्यान भारतीय क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने 2026 च्या इंग्लंड दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात एकदिवसीय आणि टी 20i अशा 2 मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात 5 टी 20i तर 3 एकदिवसीय सामन्यांचा थरार रंगणार आहे. टी 20 मालिका 1 ते 11 जुलै दरम्यान खेळवण्यात येणार आहेत. तर त्यानंतर 14 जुलैपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होईल.
🏏 टी 20 मालिका
पहिला सामना, 1 जुलै, रात्री 11 वाजता, बँक्स होम्स रिव्हरसाईड, डरहमन
दुसरा सामना, 4 जुलै, संध्याकाळी 7 वाजता, एमीरेट्स ओल्ड ट्रफर्ड, मँचेस्टर
तिसरा सामना, 7 जुलै, रात्री 11 वाजता, ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम
चौथा सामना, 9 जुलै, रात्री 11 वाजता, सीट युनिक स्टेडियम, ब्रिस्टॉल
पाचवा सामना, 11 जुलै, रात्री 11 वाजता, युटिलिटा बॉऊल, साउथम्पटन
🏏 रोहित-विराट 3 सामने खेळणार
रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीने टी 20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र दोघेही एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळणार आहेत. तसेच रोहित शर्मा एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे या दोघांनी 2026 पर्यंत निवृत्ती घेतली नाही तर 3 सामने खेळतील हे निश्चित आहे.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 14 जुलै, एजेबस्टन, संध्याकाळी साडे पाच वाजता, बर्मिंघम
दुसरा सामना, 16 जुलै, संध्याकाळी साडे पाच वाजता, सोफिया गार्डेन्स, कार्डीफ
तिसरा सामना, 19 जुलै, संध्याकाळी साडे पाच वाजता, लॉर्ड्स, लंडन
Editer sunil thorat






