ग्रामस्तरीय जनसुरक्षा मोहिमेला पुणे जिल्ह्यात रिझर्व बँकेच्या सहभागाने सुरुवात.. कदमवाकवस्ती
जनसुरक्षा मोहिमेतून महिलांनी आत्मनिर्भर व्हावे- श्री सुमन रे भारतीय रिझर्व बँक....

पुणे : ग्रामस्तरीय जनसुरक्षा मोहिमेला जिल्हयात रिझर्व बँकेच्या सहभागाने सुरुवात करण्यात आली असून या जनसुरक्षा मोहिमेतून महिलांनी आत्मनिर्भर झाले पाहिजे, असे मत भारतीय रिझर्व बॅक महाराष्ट्राचे प्रादेशिक संचालक श्री सुमन रे यांनी व्यक्त केले.
कदमवाक वस्ती येथे भारतीय रिझर्व बँक, वित्तिय समावेशान आणि विकास विभाग मुंबई व बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने 24 जुलै रोजी “ग्रामस्तरावर जनसुरक्षा मेळाव्याचे “चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्तिय समावेशान आणि विकास विभाग भारतीय रिझर्व बँकेच्या प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती निशा नंबियार, उपमहाव्यवस्थापक श्रीमती ज्योती सक्सेना, बँक ऑफ महाराष्ट्र व समन्वयक राज्य स्तरीय बँकर्स समिती महाव्यवस्थापक मनोज करे, बँक ऑफ महाराष्ट्र पुणेचे क्षेत्रिय व्यवस्थापक अमित चंदन, पुणे जिल्हा परिषद जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, बँक ऑफ महाराष्ट्रचे सहायक महाव्यवस्थापक दिपक पाटील, गट विकास अधिकारी हवेली, ग्रामसेवक अमोल घोळवे, नवपरीवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, उपसरपंच नासिर पठाण, ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री सुमन रे यांनी महिलांनी डिजीटल बँकिंग, सायबर गुन्हेगारी, डिजीटल बँकिंग बाबत काय काळजी,घ्यावी कर्ज सुविधा, ग्राहकांचे अधिकार बाबत मार्गदर्शन तसेच बँकिंग लोकपाल या योजनेची माहिती व त्यांची कार्यवाही या संबंधी माहिती दिली.
वित्तिय समावेशान आणि विकास विभागाच्या प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक श्रीमती निशा नंबियार यांनी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वित्तिय व्यवहार महत्वाचे असल्याचे सांगितले बँकेची कार्यपद्दती, बँकेमार्फत महिला बचत गट व सर्व सामान्य नागरिकांना पुरविण्यात येत असलेल्या अर्थ सहाय्य बाबत विविध सोयी सुविधा यांची माहिती दिली. बचत खात्याचे नूतनिकरण याचे महत्व, शासनाच्या विमा योजना तसेच अटल पेंशन योजना याचे महत्व, जिल्ह्यातील सर्व बँकाच्या माध्यमातून विविध समाजउपयोगी शासकीय योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाव्यवस्थापक मनोज करे म्हणाले, राज्यभरात चालत असलेल्या ग्रामस्तरावरील जनसुराक्षा मोहिमेचे नियोजन राज्य स्तरीय बँकर्स समिती करत आहे तसेच पुणे जिल्ह्यातील 1 हजार 364 ग्रामपंचायतीत ही मोहीम 30 सप्टेंबर 2025 पर्यंत राबविण्यात येणार आहे. तसेच यामध्ये सर्व ग्रामपंचायतनी बँकाना मदत करावी.
जनसुरक्षा मोहिमे अंतर्गत कदमवाक वस्ती गावातील विमा योजना लाभार्थी रेखा तानाजी घाडगे यांचे वारसांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेची 2 लाख रुपये विमा रक्कम अदा करुन या योजनांचे महत्व यावेळी त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद पुणे व बँक ऑफ महाराष्ट्र लोणी काळभोर यांचे मार्फत स्थानिक महिला बचत गटांना 47 लाख रुपयाचे अर्थ सहाय्य वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमात ग्रामपंचायत कदमवाक वस्तीतील स्थानिक नागरीक, महिला बचत गट, यांनी सर्व योजनाचा लाभ घेतला. या शिबीरामध्ये एकूण 50 जन धन खाती उघडन्यात आली, अटल पेंशन योजना 25, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना 70, प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना 35 वारस नोंद 50 इत्यादि सेवा देण्यात आल्या.
Editer sunil thorat








