
पुणे : (दि. 12) वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इच्छुकांनी www.vint.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
पैलवान कै. मारुती चव्हाण-वडार, राजे उमाजी नाईक, परमपुज्य गंगानाथ महाराज, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी, श्रीकृष्ण आणि विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) यांच्या माध्यमातून बीज भांडवल कर्ज योजना, एक लाख रुपये थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज परतावा योजना राबविल्या जात आहेत.
व्याज परतावा योजनेत संपूर्ण कर्ज बँकेकडून देण्यात येत असून, कर्जाचे हप्ते नियमित भरल्यास कमाल 12 टक्क्यांपर्यंतचे व्याज लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर महामंडळाच्यावतीने जमा केले जाईल. एक लाख थेट कर्ज योजनेत संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाईल. लाभार्थीने 2,085 रुपयांचे 48 समान मासिक हप्ते नियमित भरल्यास व्याज आकारले जाणार नाही, परंतु थकीत हप्त्यांवर वार्षिक 4% व्याजदर आकारला जाईल.
अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बी-विंग, सर्वे क्र. 105/106, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, आळंदी रोड, येरवडा, पुणे येथे किंवा दूरध्वनी क्रमांक 020-29703049 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Editer sunil thorat




