
पुणे (हवेली) : (दि.२८ जुलै २०२५) यवत (ता. दौंड) येथील नीलकंठेश्वर मदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना ही संपूर्ण महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच देणारी घटना आहे. या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ सोमवार, दि. २८ जुलै रोजी एक भव्य निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. मात्र काही कारणास्तव मोर्चा तत्पुरता स्थगित करण्यात आला असून, लवकरच पुढील नियोजन जाहीर करण्यात येईल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
या निषेध मोर्चासाठी अंबरनाथ मंदिर भक्ती-शक्ती चौक येथून सुरुवात होऊन विष्णू मंदिर, सावतमाळी मंदिर, खोकुलाई देवी चौक, मीदत्त मंदिर चौक मार्गे पोलीस स्टेशनपर्यंत मिरवणूक होणार होती. तथापि, मोर्चा स्थगित करून या घटनेच्या निषेधासाठी पुढील ठोस भूमिका घेण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या प्रसंगी लोणी काळभोर वि.वि.का. सोसायटी माजी व्हाईस चेअरमन संजय भालेराव, शिवसेना शिंदे गट पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हवेली तालुका उपप्रमुख हनुमंत सुरवसे, दिगंबर जोगदंड, गोरख मोरे, श्रीकांत काळभोर, महेंद्र जैनजागडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मिळून लोणी काळभोर पोलिसांना निवेदन सादर केले असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणीही केली आहे.
“छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याबाबत अशा प्रकारची विटंबना सहन केली जाणार नाही. प्रशासनाने तत्काळ दोषींवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला. या घटनेमुळे यवत परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून, राजकीय व सामाजिक स्तरावरूनही प्रतिक्रिया उमटत आहेत.
राजेंद्र पन्हाळे वरीष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर. यांचे आवाहन…
लोणी काळभोर परिसरातील नागरिकांनी शांतता राखून कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी, असे आवाहन लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी यावेळी केले. या संदर्भात यवत पोलीस स्टेशन योग्य कारवाई करुन समाजात तेढ निर्माण करणार्यास हयगय करणार नाही.
Editer sunil thorat






