महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! सेवेदरम्यान मृत्यू किंवा अपंगत्व झाल्यास ‘अखिल भारतीय सेवा’ अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू…

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करण्याचा निर्णय घेतला असून, २९ जुलै २०२५ रोजी सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
या निर्णयामुळे, ज्या अधिकाऱ्यांचा सेवेदरम्यान मृत्यू होतो किंवा गंभीर अपंगत्वामुळे ते सेवेअयोग्य ठरतात, अशा प्रकरणांमध्ये त्यांच्या कुटुंबियांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने ९ मे २०२५ रोजी अशाच स्वरूपाचे मार्गदर्शन देणारे पत्र जारी केले होते, त्याच्या आधारे महाराष्ट्र सरकारने आता राज्यात ही योजना लागू केली आहे.
सध्याच्या नवीन पेन्शन योजनेत समाविष्ट असलेले अधिकारी देखील या निर्णयामुळे लाभार्थी ठरणार असून, त्यांच्या कुटुंबियांना निश्चित निवृत्तीवेतन मिळण्याचा हक्क प्राप्त होणार आहे. हा निर्णय केवळ आर्थिक मदतीचा आधार नाही, तर कर्मचार्यांच्या कुटुंबीयांसाठी भविष्य सुरक्षित करणारा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण असून, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होण्याच्या मागणीस मोठा प्रतिसाद मिळत आहे. हा निर्णय सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आणि दूरदृष्टीचा असल्याची प्रतिक्रिया कर्मचारी संघटनांनी दिली आहे.
Editer sunil thorat





