कोंढवा येथे हाफ मॅरेथॉन स्पर्धा ; वाहतुकीत बदल लागू…

पुणे (दि. १९) : कोंढवा बु. (जि. पुणे) येथे दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर स्पर्धक व नागरिकांची उपस्थिती अपेक्षित असल्यामुळे वाहतुकीवर विशेष निर्बंध लावण्यात आले आहेत. मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११५ तसेच शासन गृह विभागाचे १९ मे १९९० चे अधिसूचना यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आदेश जारी केले आहेत.
वाहतुकीवरील निर्बंध…
दि. २१ सप्टेंबर रोजी पहाटे ४.०० ते सकाळी ९.००
एन.एच.-६५ व एन.एच.-९६५ दिवेघाट मार्गे सासवड येथे जाणारी सर्व वाहतूक बंद राहील.
संबंधित वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात येईल.
वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग…
1. जड व अवजड वाहने
सासवड – दिवेघाट – मंतरवाडी चौक मार्गे वळविण्यात येतील.
2. हलकी वाहने (चारचाकी)
सासवड – चांबळी – गराडे मार्गे मरीआई घाट – खेड शिवापूर या मार्गावर वळविण्यात येतील.
3. सामान्य वाहतूक पर्याय
सासवड – कोंढवा – पुणे
सासवड – दिवेघाट – मंतरवाडी
सासवड – चांबळी – गराडे – मरीआई घाट – खेड शिवापूर – कात्रज घाट (चारचाकी वाहने)
प्रशासनाचे आवाहन…
हाफ मॅरेथॉन दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गर्दी टाळावी आणि वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नागरिकांनी व वाहनचालकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.
या निर्बंधांमुळे स्पर्धकांना आणि नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.
Editer sunil thorat



