
पुणे (ता. हवेली) : मुंबईतील प्रसिद्ध मंथन आर्ट स्कूलचे संस्थापक प्रा. शशिकांत सुखदेव गवळी (वय ५४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने कला व शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पार्थिवावर मूळ गावी लोणी काळभोर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाईक, ग्रामस्थ, शिष्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रा. गवळी हे कला शिक्षण क्षेत्रातले एक समर्पित व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात. मुंबईत स्थापन केलेल्या मंथन आर्ट स्कूलमुळे असंख्य विद्यार्थ्यांना चित्रकला व कलाविष्काराची दिशा मिळाली. त्यांच्या योगदानामुळे कला क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी प्रगती केली.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, एक बहीण व भावजया असा परिवार आहे.
विशेष म्हणजे ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या ग्राहक संरक्षण परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत गवळी यांचे लहान भाऊ होत.
त्यांच्या निधनाने कला क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातही शोककळा पसरली असून, “समाजातील कलागुणांना वाव देणारे व्यक्तिमत्व हरपले” अशी भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
Editer sunil thorat




