पोलिस उपायुक्त, परिमंडळ ५ यांच्याकडून गुन्हेगारांवर मोठी कारवाई : १० सराईतांना दोन वर्षांसाठी तडीपार…

पुणे : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने कडक पावले उचलली आहेत. परिमंडळ ५ मधील गुन्हेगारांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त (जोन ५) डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच दिवशी १० सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे.
ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत करण्यात आली असून, त्यामध्ये धारा ५५ अंतर्गत २ टोळ्यांतील ७ गुन्हेगार आणि धारा ५६ अंतर्गत ३ गुन्हेगार असे एकूण १० जणांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण जिल्ह्याच्या सीमांबाहेर दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार लोणी काळभोर पोलीस स्टेशन…
1. अनिकेत गुलाब यादव (२२) – ५ गुन्हे, डकैती, अवैध शस्त्र, धमकी
2. प्रसाद उर्फ बाबू सोनवणे (२१) – ३ गुन्हे, अवैध शस्त्र, डकैतीची तयारी
कोंढवा पोलीस स्टेशन…
3. विश्वजीत भीमराव गायकवाड (४०) – ४ गुन्हे, गावठी दारू विक्री
4. करीम सय्यद अली सौदागर उर्फ लाला (२९) – टोळी प्रमुख
5. शाहरुख रमजान पठाण उर्फ फतेह (२५) – टोळी सदस्य
6. अज़हर बशीर शेख (३५) – टोळी सदस्य
7. अज़हर इरफान मेंबर उर्फ अज्जू (२८) – टोळी सदस्य
(या टोळीवर एकूण ७ गंभीर गुन्हे नोंद)
वानवडी पोलीस स्टेशन…
8. राहुल उर्फ विकी परदेशी (३५) – टोळी प्रमुख
9. विशाल राजु सोनकर (२६) – टोळी सदस्य
10. सुनिल रामु परदेशी (३०) – टोळी सदस्य
(एकूण ७ गुन्हे, जसे की मारहाण, धमकी, सरकारी कामात अडथळा, विनयभंग, दहशत निर्माण इ.)
परिमंडळ ५ पोलीसांची आतापर्यंतची कारवाई…
जानेवारी २०२५ पासून आजपर्यंत :
१६ गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई
१० मोका कारवायांमध्ये ६७ आरोपी जेरबंद
३१ जणांना तडीपार
एकूण ११४ गुन्हेगारांवर ठोस कारवाई
पोलीसांचे नागरिकांना आवाहन…
तडीपार गुन्हेगार जर त्यांच्या हद्दपार काळात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड किंवा पुणे जिल्ह्यात दिसून आले, तर नागरिकांनी तात्काळ
📞 पोलीस नियंत्रण कक्ष 112
📞 परिमंडळ ५ कार्यालय : 020-26861214
या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी केले आहे.
Editer sunil thorat




