क्राईम न्युजमहाराष्ट्र

नामांकित महाविद्यालयीन तरुणींचे अश्लील फोटो सोशल मीडियावर वायरल… लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

अंतर्गत वादावादी झाल्याने ब्रेकअप, आरोपीने ब्रेकअप झाल्याने सोशल मीडियावर फोटो व चॅटिंग करून भिंग फोडले...

पुणे (हवेली) : आधी ब्रेकअप झाले. हताश झाल्याने प्रेयसीचे अश्लील फोटो व अश्लील कमेंट करून फोटोसह सोशल मिडीयावर व्हायरल केल्याची घटना घडली आहे.

ही घटना लोणी काळभोर परिसरातील नामांकित शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या तरुणी सोबत घडली असून या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सुशांत कोळी नामक व्यक्तीवर सोमवारी (दि.१७) रात्री उशिरा लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.

सुशांत उमाकांत कोळी (रा. मांजरी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत ही लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत आहे. तर तिची मैत्रीणही त्याच संकुलात शिक्षण घेत आहे. दोघीही लोणी काळभोर परिसरात भाड्याच्या घरात राहत आहेत. दरम्यान, फिर्यादी यांची मैत्रीण आणि आरोपी यांचे प्रेमसंबंध होते. मागील काही महिन्यांमध्ये त्यांच्यामध्ये अंतर्गत वादावादी झाल्याने ब्रेकअप झाले होते. आरोपीला ब्रेकअप फिर्यादी यांच्या सांगण्यामुळे झाल्याचा संशय होता. आरोपी हा फिर्यादी यांच्या मैत्रिणीसोबत पुन्हा प्रेमसंबंध प्रस्तापित करण्यासाठी प्रयत्न करीत होता. मात्र काहीही केले तरी त्याची प्रेयसी या प्रेमसंबंध ठेवण्यास नकार देत होती. आणि इथेच या स्टोरीचा खरा चेहरा समोर आला.

प्रेयसी बोलत नाही. आपले प्रेम नाकारत असल्याचे सुशांत कोळीच्या लक्षात आल्यावर व्याकूळ झालेला सुशांतने याचा बदला घेण्याच्या उद्देशाने राग मनात धरून सुशांतने इन्स्टाग्राम अकाऊंट वरुन फिर्यादीचा फोटो ठेवुन त्याखाली अश्लील कमेंट केली. फिर्यादी व फिर्यादीची मैत्रिण यांची नावे टाकुन अश्लील कमेंट केलेली स्टोरी सोशल मीडियावर ठेवुन पोस्ट व्हायरल केली. यावर सुशांतने न थांबता फिर्यादीच्या व्हॉटसअॅप नंबर वर फिर्यादी यांच्या मैत्रिणीचे अश्लील फोटो, टिपणी टाकुन फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल. असे कृत्य करुन त्यांचा विनयभंग केला आहे. अशी फिर्याद फिर्यादीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिली आहे.

या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारी नुसार आरोपी सुशांत कोळी याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम ७५, ७८ व माहीती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६७, ६७ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे

पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे हे करत आहेत. आरोपीचा सेल फोन बंद असल्याने सध्या फरार असून लोकेशन मिळत नसल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असुन लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल असे सांगितले.

शिक्षण संस्थेच्या pro ची प्रतिक्रिया पुढील प्रमाणे…

यासंदर्भात शिक्षण संस्थेच्या मुख्य प्रतिनिधीशी PRO नाव न सांगण्याच्या अटी वरुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ती विद्यार्थीनी फक्त शिक्षण घेत आहे. या संदर्भात शिक्षण संस्था जबाबदार नाही. घटना शिक्षण संस्थेच्या बाहेर घडल्याने शिक्षण संस्था जबाबदार नाही. असे सांगितले की हि मुलगी आमच्या शिक्षण संस्थेत शिकत आहे. इतकेच. शिक्षण संस्थेत जवळपास १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असुनही त्यातील ४ हजार विद्यार्थी कॅम्पस मध्ये राहतात. आमच्या शिक्षण संस्थेत सुरक्षा प्रचंड ताईट असून ठिकाण सी. सी. टीव्ही कॅमेरे आहेत. इथे कुठलीही चुकीची गोष्ट घडत नाही. मुळात हा प्रकार सोशल मीडियावर घडला असल्याने त्यावर आमची शिक्षण संस्था नियंत्रण ठेऊ शकत नाही. असे सांगण्यात आले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??