जिल्हासामाजिक

कवडीपाट नागरिकांच्या नियमापुढे अतिक्रमण विभाग नरमले..कुठल्याही कागपत्राशिवाय अतिक्रमण काढण्यास नागरिकांचा विरोध..; कवडीपाट..

पुणे (हवेली) : कवडीपाट टोल नाका ते यवत पर्यंत अतिक्रमणास आज (ता.५) दुपारी १२:०० सुरवात होणार होती. परंतु कवडीपाट येथील सर्व नागरिकांनी विरोध करताच अतिक्रमण विभाग नरमले. कारवाई न करताच घटना स्थळावरून निघून गेले. 

पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट येथे नागरिकांनी विरोध करताच प्रशासनाचे अधिकारी हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. कारवाई आधीच प्रशासन कवडीपाट टोल नाक्यावरील दुकानदार व जाग मालक आक्रमक होताच प्रशासनाने कारवाईतून काढता पाय घेतला. व कारवाईस स्तगीथी देऊन घटनास्थळावरून माघार घेत निघून जाणे पसंत केले. आज पर्यंत तगड्या बंदोबस्तात अतिक्रमण विभाग कारवाई न करता निघून जाण्याची लाजीरवाणी वेळ प्रशासनावर आली.

कवडीपाट ते कासुर्डी टोलनाका या दरम्यानची अतिक्रमणे २१ मीटर नाही तर अतिक्रमण १५ मीटरच काढणार, या निर्णयामुळे नागरिकांनी व दुकानदारांनी सुटकेचा श्वास सोडला. पण प्रशासनाचे नियोजन नसल्याने दुकानदारांचे नुकसान झाले. नियमात असताना अतिक्रमणाच्या धसक्याने टोलनाका येथील दुकानदार यांनी स्वता:हुन अतिक्रमण नसताना दुकाने काढल्याने नुकसान झाल्याची भावना दुकानदारांनी मांडली.

                             विरोधानंतर प्रशासन नरमले…

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट येथे २१ मीटर अंतरावरील अतिक्रमणाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे नागरिकांच्या विरोधाला प्रशासन नरमले असून सध्या एनएचआयच्या हद्दीतील १५ मीटर अंतरावरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला असून त्यानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी नोटीस बजावूनच अतिक्रमण कारवाई करावी अशी आग्रही भूमिका स्थानिकांनी मांडली.

पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणे काढण्यास आज बुधवारी (ता.५) दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास सुरवात केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी २१ मीटर अतिक्रमण विरोधी कारवाईला विरोध केला. यावेळी स्थानिक नागरिक व एनएचएआय, पीएमआरडीएचे अधिकारी यांच्यामध्ये चर्चा झाली. चर्चा चालू असताना स्थानिक पोलीसांचा ताफा त्याठिकाणी पोहचला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी अतिक्रमण विभागाचे अधिकारी व नंदकिशोर काळभोर, सुरेश काळभोर, अतुल काळभोर, आकाश काळभोर, महादेव कामठे, राकेश लोंढे व स्थानिक नागरिकांशी समन्वय साधून चर्चा घडवून आणली. व संघर्ष टाळला.

या चर्चेदरम्यान एनएचआयच्या हद्दीतील १५ मीटर अंतरावरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील १५ मीटरवरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. व कवडीपाट टोल नाक्यापासून या कारवाईला सुरवात झाली आहे.

दरम्यान, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कवडीपाट ते यवत या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असुन यामध्ये हॉटेल, अनधिकृत टपऱ्या व दुकानांचा समावेश आहे. त्यामुळे रस्त्यावरील ही अतिक्रमण करून थाटलेली दुकाने निघणार १६ मीटर अंतरावरील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत.

तसेच उर्वरित ६ मीटरवरची अतिक्रमणे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नोटीस बजावून लवकरच काढणार? का स्थानिकांना भरपाई मिळणार का? पाठीमागील काळात ही भरपाई मिळावी नसल्याने यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला. अशा नियम माहीत नसलेले अधिकारी नागरिकांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने देणार याकडे कवडीपाट व संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

                                स्थानिक नागरिकांचा प्रश्न…

अतिक्रमण विभाग कारवाई करत असताना ठराविक ठिकाणीच कारवाई करत आहे. असे नागरिक चर्चा करत होते. हडपसर, १५ नंबर कारवाई करत असताना बस स्टाॅप, जाहिरातीचे लोखंडी बॅनर, शासकीय भिंत, बंद पडलेला टोल नाक्याचा सांगाडा यावर अधिकारी मेहरबान का? काही ठिकाणी भिंतीवर कारवाई केली नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून ही कारवाई करण्यात आली नाही. यावर प्रशासनाची हाताची घडी तोंडावर बोट असल्याचे नागरिकांनी सांगितले.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??