श्री गणेशाय नमः स्वामी सेवेचा वसा हे स्वप्न प्रत्येकाच्या घराघरात, आॅनलाईन सेवेच्या माध्यमातून मार्गदर्शन ; अविनाश (दादा) बडगुजर..

सुषमा बुर्डे / पिंपरी चिंचवड
पुणे (खेड) : हवनयुक्त भैरवचंडी शुक्रवार, ७ मार्च, २०२५ सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत १२:०० ते २:०० वाजेपर्यंत आदरणीय गुरुवर्य अविनाश बडगुजर यांचे बहुमुल्य मार्गदर्शन लाभणार आहे असे आवाहन श्री गुरुदेव दत्त अध्यात्मिक विकास सेवा केंद्र पुणे येथील सेवेकरी यांनी केली आहे.
श्री गणेशाय नमः स्वामी सेवेचा वसा हे स्वप्न प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवणे व आदरणीय अविनाश दादांचे मार्गदर्शन जगभर नेणारा श्री गुरुदेव दत्त भक्त परिवार या ग्रुपची सुरुवात मार्च २०२० मध्ये झाली. या ग्रुपच्या माध्यमातून अध्यात्मिकतेचे महत्त्व पटवून देणे, बालसंस्कार व युवा पिढी मार्गदर्शन तसेच वेगवेगळ्या सेवाही घेतल्या जातात. जसे दररोज स्वामी चरित्र सारामृतपाठ, दुर्गा सप्तशती पाठ, रुद्र पाठ, श्री यंत्राची सेवा, गणपती अथर्वशीर्ष या सर्व सेवा प्रत्येक सेवेकरी स्वतः घरात बसून ऑनलाइन टेलिग्राम ऍपच्या माध्यमातून करत आहेत. भागवत ग्रंथ, गुरुचरित्र व नवनाथ पारायणाचे महत्त्व या माध्यमातून सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते. त्याचबरोबर ज्यांचे दुःख, अडचणी आहेत त्या प्रश्न उत्तराच्यामार्फत सेवा देऊन, त्यांचे प्रश्न सोडवले जातात.
स्वामी सेवेकरी हा सरळमार्गी व निःस्वार्थी असावा हा वसा जो प्रत्येकाच्या घरात पोहोचवेल व जे जे दुःखात, अडचणीत आहेत त्यांना स्वामी सेवेत आणेल व त्यांचे दुःख सोडवेल त्यांच्या पाठीशी स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव असेल. या ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्र व देशभर स्वामी सेवेकरी जोडले गेले आहेत,
अविनाश बडगुजर यांच्या ऑनलाइनच्या माध्यमातून सर्व सेवेकऱ्यांना आशिर्वाद रुपी भेटत असतात. श्री गुरुदेव दत्त अध्यात्मिक विकास सेवा केंद्र पुणे, प्रमुख अविनाश दादांच्या इच्छेनुसार संपूर्ण महाराष्ट्रत सेवेकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून स्वामी आशिर्वाद देऊन, स्वामी सेवा समजून सांगण्याचा मानस आहे. तरी पुणे नगरी येथील आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन भूमीत तसेच आजूबाजूच्या शहरातील सर्व स्वामी सेवेकऱ्यांनी या अमृततुल्य मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री गुरुदेव दत्त भक्त परिवाराकडून सर्व सेवेकरी व दत्त भक्तांना सूचित करण्यात आले आहे.
या बहुमुल्य हवनयुक्त भैरवचंडी श्रीपाद श्री वल्लभ प्रति पिठापुर मंदिर, प्लुमेरिया लक्झरी बँकेट्स, जिल्हा परिषद शाळेजवळ, चर्होली – आळंदी बायपास, चर्होली खु.।। पगडे वस्ती, ता. खेड, जि. पुणे या ठिकाणी होणार असून या मार्गदशनाचा लाभ परिसरातील भक्तांनी घ्यावा.



