सामाजिक
ब्रांझ मेडल विजेता, आंध्रप्रदेश (गुंटर) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा साठी आणि महाराष्ट्राकडून सांघित प्रकारासाठीही निवड..; चि. विजयकृष्ण थोरात.

डॉ गजानन टिंगरे पुणे
पुणे (इंदापूर) : (दि.01) रोजी डेरवण (रत्नागिरी) येथे झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा मधून चि. विजयकृष्ण स्वाती नवनाथ थोरात रा. माळशिरस याने ब्रांझ मेडल पटकावले तसेच त्याची आंध्रप्रदेश (गुंटर) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा साठी आणि महाराष्ट्राकडून सांघित प्रकारासाठीही निवड झाली.
चि. विजयकृष्ण हा शिवरत्न सी.बी.एस.सी स्कुल अकलुजचा विद्यार्थी आहे. त्याचे क्रिडा प्रशिक्षक सुरज ढेंबरे, शेखर देवकर आणि निखिल गुरव यांचे वेळावेळी मागदर्शनामुळे सदर यश प्राप्त झाले असे पालकांनी मनोगत व्यक्त केले.



