महाराष्ट्रशिक्षण

‘एमआयटी एडीटी’च्या विद्यार्थ्यांचे हॉरीझॉन एआय हॅकेथॉनमध्ये यश ; संघाने तिसरा क्रमांक पटकावत तब्बल १००० डाॅलर्सचे पारितोषिक मिळवले..

पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या स्कूल ऑफ कॉम्प्युटिंगच्या (एमआयटी एसओसी) विद्यार्थ्यांनी हॉरीझॉन एआय हॅकेथॉन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे.

अमेरिकेतील मियामी विद्यापीठाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत, “सिकल सेल डिटेक्टर” या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी मधुर पाटील, अनुराग अहिरराव, अर्णव बुळे आणि निधी फोफळीये यांचा समावेश असलेल्या संघाने तिसरा क्रमांक पटकावत तब्बल १००० डाॅलर्सचे पारितोषिक जिंकले आहे.

“सिकल सेल डिटेक्टर” हा एक अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)-आधारित उपाय असून, जो सिकल सेल आजाराचे वेळीच आणि अचूक निदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. विशेषतः दुर्गम आणि आरोग्य सुविधांचा अभाव असलेल्या भागांमध्ये हा प्रकल्प मोठी मदत करू शकतो. एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्वरित निदान आणि उत्तम उपचार पद्धती उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी प्रा.डाॅ.रंजना काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य यांचे उत्कृष्ट प्रदर्शन करत आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली.

विद्यार्थ्यांच्या या यशानंतर विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस, प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.सुरेश कापरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??