क्राईम न्युज

वालचंदनगर पोलीसांची धडक कारवाई ; १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्याचा छडा…

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावणारे दोन तरुण अटकेत...

डॉ. गजानन टिंगरे संपादक 

इंदापूर (पुणे) : इंदापूर तालुक्यातील मौजे काझड गावात 31 ऑगस्ट रोजी घडलेल्या जबरी चोरी प्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. या आरोपींनी एका 60 वर्षीय महिलेला दुकानात एकटी पाहून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाले होते.

सिंधु काशिनाथ नरूटे (वय 60, रा. काझड) या महिला किराणा दुकानात खरेदी करत असताना आरोपींनी युनिकॉर्न दुचाकीवर येऊन दुकानात प्रवेश केला. किराणा सामान घेण्याच्या बहाण्याने एका आरोपीने महिलेवर झडप घालून मंगळसूत्र हिसकावले आणि साथीदारासह दुचाकीवरून काझड गावातील रस्त्याने पसार झाला. याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी काझड, भवानीनगर, बोरी, लाकडी, लिंबोडी तसेच बारामती तालुक्यातील विविध गावांमधील सुमारे 100 सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी गुणवडी (ता. बारामती) येथील असल्याचे स्पष्ट झाले. गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून रोहित विजय बोरकर (वय 21, रा. गुणवडी, ता. बारामती) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार रोहित ऊर्फ कोच्या दिपक कुदळे (वय 20, रा. बांदलवाडी, ता. बारामती) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.

दोन्ही आरोपींना न्यायालयाने 11 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, चोरी केलेले सोने, रोख रक्कम व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, उपनिरीक्षक मिलींद मिठापल्ली, हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, जगदीश चौधर, सतिष फुलारे, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर, रणजित देवकरअभिजीत कळसकर यांनी सहभाग घेतला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??