
हवेली (पुणे) : भारतीय जनता पार्टी हवेली तालुका सोलापूर रोड मंडल किसान मोर्चा अध्यक्षपदी तानाजी आप्पा रामचंद्र काळभोर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे परिसरातील शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणारे आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले काळभोर यांच्या नेतृत्वामुळे किसान मोर्चा अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
तानाजी आप्पा रामचंद्र काळभोर यांच्या या निवडीबद्दल कार्यकर्त्यांनी व विविध सामाजिक, राजकीय मंडळींनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून, आगामी काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी ते प्रभावीपणे काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Editer sunil thorat



