
संपादक सुनिल थोरात
पुणे (हवेली) : कदमवाकवस्ती येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा २२ जूनला मुक्कामी असल्याने सर्व शासकीय यंत्रणांनी पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करावे.
प्रशासनाची पालखीच्या संदर्भात कदमवाकवस्ती येथे प्रशासनाच्या सर्व विभागांची नियोजित बैठक चालू असताना “वारकऱ्यांच्या पायाला खडा टोचला, तर मी तुम्हाला टोचणार”, असे कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अमोल घोळवे यांना हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी कडक शब्दात सुनावले.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी तळ मुक्काम पूर्वतयारी नियोजन बैठकीचे गुरुवारी (ता. ५) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास चालू झाली. यावेळी बोलताना हवेलीचे उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांनी प्रशासनाच्या सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यांना सुचना व नियोजनाची माहिती दिली.
या प्रसंगी लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते, हवेलीचे गट विकास अधिकारी शिवाजीराव नागवे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेश धाडवे, सहाय्यक अभियंता विक्रांत ओहोळ, हवेली तालुका आरोग्य अधिकारी गोरे, विस्तार अधिकारी महेश वाघमारे, मंडलाधिकारी लक्ष्मण बांडे, कदमवाकवस्ती तलाठी अरुण वेडे, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के, उदय काळभोर, कदमवाकवस्ती पोलीस पाटील प्रियांका भिसे, दादा काळभोर, वन परिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्रीवर्धन जाधव, संतोष नलावडे ज्युनिअर इंजिनिअर बांधकाम विभाग हवेली आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रांताधिकारी यशवंत माने म्हणाले की, आषाढी वारी निमित्ताने दरवर्षी लाखो वैष्णव भक्त पंढरपूरला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत असताना वारकऱ्यांचे आरोग्य, पिण्याचे पाणी, निवार्यासाठी जागा, भोजन व्यवस्था, सर्व पाण्याचे स्त्रोत तपासून घ्या. विद्युत पुरवठा, स्वच्छतागृहे उभारा. पालखी स्थळ व परिसर स्वच्छ ठेवावा. पोलीस प्रशासनाने पालखी सोहळ्यादरम्यान अलर्ट राहावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती त्वरित करावी. यामध्ये कोणीही हलगर्जीपणा केला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. असा इशारा हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांनी दिला आहे.
यावेळी लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर, उपसरपंच गणेश कांबळे, उपसरपंच कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासीर पठाण, माजी सरपंच योगेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, अविनाश बडदे, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, नवपरीवर्तन फाऊंडेशनचे चेअरमन चित्तरंजन गायकवाड, सतीश गवारी, पाषाणकर गॅस एजन्सीचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





