महाराष्ट्रराजकीय

जोगेंद्र कवाडेंना ‘मुर्दाबाद’च्या घोषणांमुळे कार्यक्रमातून हाकललं भाजप महायुतीसोबत असल्याने संतप्त जनतेचा जोरदार विरोध…

नागपूर : लाँग मार्चचे प्रणेते, माजी आमदार आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी (PRP) चे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांना शनिवारी (ता. 16) नागपुरात झालेल्या जनसंवाद कार्यक्रमातून संतप्त लोकांच्या विरोधामुळे बाहेर पडावे लागले. महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासंदर्भातील हा कार्यक्रम रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वातावरण शांत असले तरी, प्रा. कवाडे मंचावर येताच अचानक गोंधळ सुरू झाला. त्यांनी माईक हाती घेताच सभागृहात ‘मुर्दाबाद’च्या घोषणा घुमू लागल्या. उपस्थित लोकांनी जोरदार विरोध दर्शवित घोषणाबाजी सुरू ठेवली. गोंधळ थांबवण्याचा आणि बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु घोषणांचा आवाज वाढतच गेला. अखेर, वाढत्या संतापामुळे त्यांना कार्यक्रमातून निघून जावे लागले.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, कवाडे यांच्या पक्षाने अलीकडेच भाजप महायुतीसोबत हातमिळवणी केल्यामुळे बौद्ध समाजातील काही घटक संतप्त आहेत. या असंतोषाची झलक थेट कार्यक्रमात दिसून आली.

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी बीटी ॲक्ट 1949 रद्द करण्याचा ठराव मांडण्यात आला. कार्यक्रमात महाबोधी विहार आंदोलनाचे अग्रणी भंते विनयाचार्य, भारतीय भिक्षसंघाचे भंते रेवत संघनायक, भंते उपगुप्त, भीमराव आंबेडकर, भदंत ज्ञानज्योती, भंते हर्षबोधी आदी उपस्थित होते. भगवान बुद्ध यांची भूमिका साकारणारे अभिनेते हिमांशू सोनी हेही प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी यापूर्वी मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या कार्यकाळात त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती झाली होती, परंतु खैरलांजी आंदोलनाच्या वेळी त्यांनी निषेध म्हणून राजीनामा दिला होता. नंतर त्यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची स्थापना केली. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर त्यांच्या पक्षाने शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचे पुत्र व पक्षाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे हे औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत.

या संपूर्ण घडामोडीमुळे नागपुरातील बौद्ध समाजाच्या असंतोषाला पुन्हा एकदा हवा मिळाल्याचे स्पष्ट दिसून आले.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??