
पुणे : (दि. 12) महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुकांनी www.msobcfdc.org/msobefde.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
महामंडळामार्फत 20 टक्के बीज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना आणि कौशल्य विकास प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, इमारत क्रमांक बी, सर्वे क्रमांक 104/105, मनोरुग्णालय कॉर्नर, पोलीस चौकीसमोर, विश्रांतवाडी, येरवडा येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 020-29523059 किंवा ईमेल – dmobcpune@gmail.com वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Editer sunil thorat




