
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘ग्रंथालयशास्त्राचे जनक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. एस.आर. रंगनाथन यांना अभिवादन करण्यात आले. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. दत्तात्रय संकपाळ यांनी केले.
प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. रंगनाथन यांनी भारतात ग्रंथालयशास्त्राचा पाया रचला व सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला चालना दिली. ग्रंथालय वाचककेंद्री व्हावे यासाठी त्यांनी ‘पंचसूत्री’ दिली. प्रत्येक ग्रंथाला वाचक आणि प्रत्येक वाचकाला ग्रंथ मिळावा ही त्यांची भूमिका होती. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवले, असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. अनिल जगताप, डॉ. लतेश निकम, डॉ. गंगाधर सातव, डॉ. नाना झगडे, डॉ. रवींद्र मेने, डॉ. किरण रणदिवे, प्रा. भाऊसाहेब भोसले, प्रा. संध्याराणी आटोळे, पवन कर्डक, अशोक शेकडे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. नाना झगडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. लतेश निकम यांनी केले.
Editer sunil thorat





