
पुणे (हवेली) : लहान मुलांच्या गुड टच बॅड टच बरोबर मोठ्या विद्यार्थ्यांना देखील महत्त्वाच्या सूचना देत लहान मुलांबरोबर युवा पिढीला या कार्यशाळेत जागृती करण्यात आली.
आज (दि. १४) रोजी महिला पोलीस अंमलदार शिल्पा हरिहर – बक्कल नंबर ११००२, महिला पोलिस अंमलदार दीपिका थोरात बक्कल नंबर ७२६३ दामिनी मार्शल लोणी काळभोर यांनी एंजल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज (sse), इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), इनोवेरा इंग्लिश मीडियम स्कूल कदम वाकवस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धुमाळ मळा या शाळांना भेटी देत कार्यशाळा बरोबर जनजागृती करण्यात आली.
त्याचप्रमाणे “मुक्ताई मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूल धुमाळमळा कुंजीरवाडी” या ठिकाणी पहिली ते दहावी विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली, कार्यशाळे दरम्यान ६०४ विद्यार्थी व मा. मुख्याध्यापिका प्रीती दोरगे, २० महिला शिक्षिक वर्ग यावेळी उपस्थित होते.
कार्यशाळे दरम्यान मुलांना मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे शारीरिक मानसिकतेवर दुष्परिणाम, आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव सौजन्याने वागावे, शिक्षकांशी कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करू नये, मुलींशी गैरवर्तन करू नये, अठरा वर्षाच्या आत मुलांना वाहन परवाना नसल्याकारणाने अपघातासारखे प्रकार टाळण्यासाठी कोणीही रोडवर गाडी चालू नये, लहान मुलीना गुड टच बॅड टच याचे प्रात्यक्षिक करून समजून सांगण्यात आले.
त्याबरोबर अशा प्रकारचे कृत्य जर कोणी केले तर तात्काळ न घाबरता आपल्या पालकांशी, शिक्षकांशी संपर्क साधावा, इंस्टाग्राम, फेसबुक व इतर सोशल मीडियाचा वापर करून स्वतःचे वैयक्तिक फोटो व वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये, व तसे केल्यास त्याचे होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले,
शाळेमध्ये भांडणे व अश्लील शब्दांचा वापर करू नये, वेळ वाया न घालवता करिअर कडे लक्ष द्यावे, अनोळखी व्यक्तीने दिलेले काही खाऊ नये, अनोळखी ठिकाणी अनोळखी व्यक्ती सोबत जाऊ नये, रस्त्याने येताना जाता सुरक्षिततेने वागावे, वाहतुकीचे नियम व्यवस्थित पाळावे, तसेच मोठ्या मुलांना अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहावे, प्रेम प्रकरणे, पॉक्सो कायद्याबद्दल मार्गदर्शन केले,
त्याच बरोबर या कार्यशाळेत शाळेना देखील तंबी देण्यात आली. शाळेमध्ये सीसीटीव्ही, तक्रार पेटी, पार्किंची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था याबाबत शिक्षकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या,
लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस मदतीची गरज भासल्यास पोलीस हेल्पलाइन नंबर ११२, महिला हेल्पलाइन नंबर १०९१ चाइल्ड हेल्पलाइन नंबर १०९८ सायबर हेल्पलाइन नंबर व दामिनी मार्शल यांचे संपर्क नंबर देऊन अशा घटना घडत असतील तर सदर हेल्पलाईन नंबरवर किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला तात्काळ संपर्क करण्याच्या सूचना यावेळी महिला पोलीस अंमलदार शिल्पा हरिहर – बक्कल नंबर ११००२, महिला पोलिस अंमलदार दीपिका थोरात बक्कल नंबर ७२६३ दामिनी मार्शल लोणी काळभोर लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या दामिनी यांनी दिल्या.





