
लोणी काळभोर (पुणे) : (दि. ६ सप्टेंबर २०२५) पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेल्या कृत्रिम हौदात आज बाजार मैदान परिसरातील एका कुटुंबाने घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन केले. या उपक्रमाचे कौतुक करत लोणी काळभोर सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर, नितीन जगताप, पै. मनोज काळभोर, नेता केसकर यांच्या हस्ते त्या कुटुंबाला प्रशस्तिपत्रक व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.
या वेळी मान्यवरांनी नागरिकांना आवाहन केले की, गणेशमूर्ती विसर्जन करताना पर्यावरणाचा विचार करून कृत्रिम हौदांचा वापर करावा. असे आवाहन करण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असून, जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी लोणी काळभोर सरपंच राहुल दत्तात्रय काळभोर यांच्या वतीने करण्यात आले.
Editer sunil thorat





