जिल्हाराजकीयसामाजिक

जिल्ह्यातील वाहतुकीत तात्पुरते बदल; २७ ते २९ ऑगस्ट दरम्यान आदेश लागू…

पुणे, दि. 26 : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातून काढण्यात येणाऱ्या मोर्चामुळे वाहतुकीवर मोठा ताण येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 115 अन्वये विशेष आदेश जारी केले आहेत. हे आदेश २७ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजल्यापासून २९ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहतील.

मोर्चाचा मार्ग…
अहिल्यानगर-आळेफाटा-ओतूर-बनकर फाटा मार्गे किल्ले शिवनेरी असा असून, दुसऱ्या दिवशी किल्ले शिवनेरीहून नारायणगाव-खेड-चाकण-तळेगाव-लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणार आहे.

वाहतूक बदलाचे तपशील पुढीलप्रमाणे…

नगरकडे जाणारी वाहतूक : जांबुत फाटा (क्र.१४) येथून बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगर मार्गे.

नारायणगाव–जुन्नर वाहतूक : ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुक मार्गे.

नारायणगाव–पुणे वाहतूक : नारायणगाव बायपासमार्गे कारफाटा-मंजर पोलीस स्टेशन-नागापूर-रोडेवाडी फाटा-लोणी-पाबळ-शिक्रापूरमार्गे नगर रोडवरुन पुण्याकडे.

मोर्चाच्या मार्गानुसार वळवणी : मंचर-निघोटवाडीमार्गे जीवनखिंड-नंदी चौक असा पर्यायी मार्ग.

खेड–पुणे वाहतूक : पाबळ मार्गे.

जुना पुणे-मुंबई महामार्ग (क्र.४८) : वाहतूक नवीन द्रुतगती मार्गावर वळविण्यात आली आहे.

चाकण–देहुरोड–मुंबई : वडगाव फाटा-उर्से टोलनाका मार्गे.

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग : वलवण एक्झिटवरुन लोणावळा शहरात वळविणार नाही; वाहने थेट मुंबईकडे.

जुना मुंबई–पुणे महामार्ग : खंडाळा-वलवण एक्झिटवरुन वाहने थेट पुण्याकडे.

लोणावळा परिसरातील वाहतूक : जुन्या महामार्गावर न जाता वलवण पुलावरुन थेट द्रुतगती मार्गाने मुंबई व पुण्याकडे.

जिल्हा प्रशासनाने नागरिक, वाहनचालक व प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??