
पुणे (हवेली) : महाराष्ट्र शासनाने यावर्षीचा गणेशोत्सव “राज्य उत्सव” म्हणून साजरा करण्याचे आदेश दिल्यानंतर पुणे शहर पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सामाजिक उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
त्याच अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
२९ ऑगस्ट रोजी विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर घेण्यात आले. तसेच मोबाईलचा अतिरेकी वापर व महिलांवरील अत्याचार प्रतिबंध यावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
३० ऑगस्ट रोजी समाजभूषण गणपतराव काळभोर सीनियर कॉलेज व पृथ्वीराज कपूर ज्युनियर कॉलेज येथे व्यसनमुक्तीवर आधारीत पथनाट्य व व्याख्यान आयोजित करण्यात आले. सुमारे ३५० विद्यार्थी, प्राध्यापक तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते. पुणे जिल्हा शिक्षणमंडळ विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याद्वारे अंमली पदार्थाचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले.
या उपक्रमांद्वारे गणेशोत्सव “राज्य उत्सव” ही संकल्पना अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचत असून नागरिकांकडून पोलीस प्रशासनाच्या या आगळ्या-वेगळ्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
Editer sunil thorat







