जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्ट बरखास्त ; नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सरकारचा मोठा निर्णय…

अहिल्यानगर : राज्यातील प्रसिद्ध व श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टवर राज्य सरकारने कारवाई करत ट्रस्ट बरखास्त केली आहे. दीर्घकाळ चालत असलेले आर्थिक गैरव्यवहार, बनावट ॲपद्वारे लाखो भाविकांची लूट, तसेच प्रशासनातील अनियमितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडे मंदिराची धुरा…

नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना होईपर्यंत मंदिराचा कारभार व व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. मंदिराची स्थावर-जंगम मालमत्ता, भाविकांच्या सुविधा तसेच पारदर्शक व शिस्तबद्ध कारभारासाठी जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून कार्यभार पाहणार आहेत.

बनावट ॲपद्वारे कोटींचा घोटाळा…

स्थानिक आमदार विठ्ठल लंघे यांनी देवस्थानातील गैरव्यवहार उघडकीस आणले होते. ट्रस्टच्या काही विश्वस्तांनी बनावट मोबाईल ॲप तयार करून ऑनलाईन पूजेच्या नावाखाली लाखो भाविकांकडून देणग्या उकळल्याचा आरोप आहे. या बनावट ॲपद्वारे तब्बल ३-४ लाख भाविकांकडून मोठी रक्कम वसूल झाली.

याशिवाय, बोगस भरती प्रकरण आणि इतर गैरव्यवहार उघडकीस आले आहेत. आमदार विठ्ठल लंघे यांनी हा घोटाळा सुमारे १०० कोटींचा असल्याचे सांगितले. तर भाजप नेते सुरेश धस यांनी हा घोटाळा तब्बल ५०० कोटींपर्यंत पोहोचल्याचा आरोप केला असून, काही विश्वस्त सदस्य दर आठवड्याला कोट्यवधींच्या जमिनी खरेदी करत असल्याचा दावा केला होता.

कायदा-सुव्यवस्थेची बिघडलेली स्थिती…

आर्थिक घोटाळ्यांबरोबरच, शनिदेवाच्या चौथऱ्यावर प्रवेश प्रकरणामुळे सामाजिक तणाव वाढला होता. यामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली होती. हे सर्व घटक लक्षात घेऊनच सरकारने ट्रस्ट बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले.

भाविकांसाठी पारदर्शक कारभाराचे आश्वासन…

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घेतलेल्या या निर्णयामुळे शनिशिंगणापूर मंदिराच्या व्यवस्थापनात मोठे बदल घडणार आहेत. भाविकांना सुविधा मिळाव्यात, मंदिराची संपत्ती सुरक्षित राहावी आणि आर्थिक पारदर्शकता राखली जावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कारभार सुरू राहणार आहे.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??