” शालेय शिक्षीका महिलेचा विनयभंग, लोणी काळभोर पोलीसांनी आरोपीविरुध्द पाठवीले २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र ” वाचा सविस्तर..

पुणे (हवेली) : दिनांक २८/०३/२०२५ रोजी दुपारी ११/३० वा. चे सुमारास, मौजे कदमवाकवस्ती गावातील एका शाळेमधील शालेय शिक्षीकेवर विनयभंगाचा प्रकार घडला आहे.
सदर बाबत पिडीत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाणेस तक्रार दाखल केली आहे. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस आरोपी नामे गणेश सुरेश अंबिके वय ४५ वर्षे रा. त्रिमुर्ती मंदिराजवळ, लोणी काळभोर पुणे याचेविरुध्द गु. र. नं. १४७/२०२५ बी. एन. एस. कलम ७४, ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३) प्रमाणे दि. २८/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
या गुन्हयातील आरोपीने पिडीत महिला शाळेतील वर्गामध्ये बसल्या असताना, शाळेत जावुन त्यांचेशी महत्वाचे बोलायचे आहे असे सांगुन वर्गाबाहेर बोलावले. त्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपीने पिडीत शिक्षीका महिलेचा हात पकडुन जवळ ओढुन त्यांचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होण्याजोगे कृत्य करुन विनयभंग केला. तसेच पिडीत महिलेस हाताने मारहाण करुन अश्लिल शिवीगाळ केली. त्याबाबत वरिलप्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला होता.
वरील गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के यांनी सदर गुन्हयाचा तपास अतिशय शिघ्रगतीने पुर्ण करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावे संकलीत केले. तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के यांनी अवघ्या २४ तासांचे आतच आरोपीविरुध्द सबळ व प्रभावी पुरावे प्राप्त करुन आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याचा कोर्ट केस नंबर १६३०/२०२५ दि. २९/०३/२०२५ असा आहे. तसेच यातील आरोपीस दोषारोपपत्रासह मा. न्यायलायात हजर करणेत आले होते त्यामुळे मा. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महिला सुरक्षीतता व महिलांना न्याय देण्याचे उदात्त हेतुने, महिलांविरुध्दचे विनयभंगांचे गुन्हयाचा तपास अतिशय शिघ्रगतीने पुर्ण करुन २४ तासांचे आत आरोपीसह मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणेबाबत अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी आदेश निर्गमीत केले.
त्यानुसार राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर व राजेंद्र पन्हाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी दिगंबर सोनटक्के व दप्तरी पोलीस शिपाई ९९२८ अमोल जाधव यांनी सदर गुन्हयाचा तपास २४ तासांचे आत पुर्ण करुन आरोपीविरुध्द मा. न्यायालयात दोषोरोपपत्र दाखल करुन पिडीत महिलेस न्याय देण्याचे दृष्टीने प्रभावी प्रयत्न केले आहेत.



