जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

प्रकाश आंबेडकरांचा सरकारवर घणाघात ; मराठा आरक्षणावरून वाद चिघळला…

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापलं आहे. आझाद मैदानावर उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या मागण्या मान्य करून सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला आणि जरांगेंनी उपोषण मागे घेतलं. या निर्णयामुळे मराठा समाजात समाधानाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी ओबीसी समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, या मुद्यावर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारच्या निर्णयावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

✦ संभाजीनगर खंडपीठाचा दाखला…

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “सरकारने घेतलेला निर्णय कायद्याला धरून नाही. मराठा आणि ओबीसी यांचे ताट वेगळे असले पाहिजे. संभाजीनगर खंडपीठाच्या निकालात स्पष्ट म्हटलं होतं की सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणता येणार नाही. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयातही शिक्का मोर्तब झालं आहे.” त्यामुळे ओबीसी समाजाचा आरक्षणावरचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

✦ जरांगेंना धक्का?

राज्य सरकारने जरांगेंच्या आठ मागण्यांपैकी सहा मान्य करून त्यांचे उपोषण सोडवले. पण ओबीसी नेत्यांनी सुरुवातीपासूनच या निर्णयाचा विरोध दर्शवला आहे. छगन भुजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. आता प्रकाश आंबेडकरांचं मतही जरांगेंच्या भूमिकेला धक्का देणारं ठरत आहे.

✦ भाजपवर तीव्र टीका

आंबेडकरांनी थेट भाजपवर टीका केली. “निझामी मराठे जे सत्तेत आहेत तेच ओबीसी आणि मराठा समाजामध्ये भांडण लावत आहेत. भाजपने एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत. आरक्षण असू नये असा गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. भारतिय जनता पक्ष म्हणतो की आमचा डीएनए ओबीसी आहे; पण ओबीसींनी हे लक्षात ठेवावं की त्यांचा सर्वात मोठा शत्रू भाजपच आहे,” असा घणाघात त्यांनी केला.

✦ ओबीसींना राजकीय संदेश

“मंडल आयोग वाचवणं हे आता ओबीसींच्या हातात आहे. दोन-चार ओबीसी सदस्य जिल्हा परिषदेत पाठवण्यापेक्षा संपूर्ण सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. ओबीसींनी राजकीय अस्तित्व प्रस्थापित केलं नाही तर त्यांचं आरक्षण धोक्यात येईल,” असा स्पष्ट इशारा आंबेडकरांनी दिला.

✦ मराठा समाजाला न्याय पण ताट वेगळं

यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या टीममधील वकिलांचा उल्लेख केला. “त्यांनी दिलेले कायदेशीर सल्ले जरांगेंनी मान्य केले नाहीत. मराठा समाजाला न्याय मिळायलाच हवा; पण त्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे. ओबीसींचा हक्क अबाधित राहील याची काळजी घेतली पाहिजे,” असा पुनरुच्चार आंबेडकरांनी केला.

Editer sunil thorat 

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??