34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर ; दिवाळीनंतर होणार स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक… ठरलं तर मग…

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय जाहीर झाला आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना रणनीती आखण्यास मदत होणार आहे. दिवाळीनंतर या निवडणुका पार पडणार असल्याचे संकेत आहेत.
सर्वसाधारण गटासाठी 8 जिल्हे…
रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आरक्षित करण्यात आले आहे.
सर्वसाधारण महिला गटासाठी 8 जिल्हे…
ठाणे, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, लातूर, अमरावती, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये अध्यक्षपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग…
पुरुष मागस प्रवर्गासाठी : सोलापूर, हिंगोली, नागपूर व भंडारा जिल्हे.
महिला मागस प्रवर्गासाठी : रत्नागिरी, धुळे, सातारा, जालना व नांदेड जिल्हे.
अनुसूचित जाती गट…
अनुसूचित जाती महिला : बीड, चंद्रपूर.
अनुसूचित जाती पुरुष : हिंगोली, परभणी, वर्धा.
अनुसूचित जमाती गट…
अनुसूचित जमाती महिला : अहिल्यानगर, अकोला, वाशिम.
अनुसूचित जमाती पुरुष : नंदुरबार.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण : संपूर्ण यादी…
ठाणे – सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसूचित जमाती
रायगड – सर्वसाधारण
रत्नागिरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक – सर्वसाधारण
धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार – अनुसूचित जमाती
जळगाव – सर्वसाधारण
अहिल्यानगर – अनुसूचित जमाती (महिला)
पुणे – सर्वसाधारण
सातारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर – सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली – अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा – सर्वसाधारण
यवतमाळ – सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा – अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)
या घोषणेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उमेदवारांची मांडणी, गटबांधणी आणि पक्षांची रणनीती कशी असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Editer sunil thorat



