
संजय सकपाळ
पुणे : पीएम श्री केंद्रीय विद्यालय क्र. २, वायुसेना स्थानक, पुणे येथे १९ आणि २० ऑगस्ट रोजी प्रादेशिक युवक संसद आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध केंद्रीय विद्यालयांमधून सुमारे ५०० विद्यार्थी प्रतिनिधी आणि ८० शिक्षक मार्गदर्शक या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
या युवक संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संसदीय कार्यपद्धती, लोकशाही मूल्ये, विचारमंथन आणि चर्चेची संधी मिळणार आहे. कार्यक्रमादरम्यान आदर्श संसदीय अधिवेशने, समकालीन विषयांवरील चर्चा आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे आयोजित केली जातील.
मुख्याध्यापक संजय कुमार पाटील यांनी सांगितले की, “राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या उद्दिष्टांनुसार सक्रीय नागरिकत्व आणि सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे.” या कार्यक्रमाचे वार्तांकन करून भावी पिढीच्या तरुण नेत्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
Editer sunil thorat




