लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट! ८ ऑगस्ट रोजी मिळणार जुलैचा हप्ता ; आदिती तटकरेंची घोषणा…

मुंबई : लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला, म्हणजेच ८ ऑगस्ट रोजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे.
ट्वीटद्वारे माहिती देताना त्यांनी म्हटलं, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.”
या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला ₹1500 सन्मान निधी थेट हस्तांतरित केला जातो. यामुळे लाखो महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर उसळली आहे.
पण 26.34 लाख महिला अपात्र!
या योजनेत मोठा फेरफार झाल्याचं समोर आलं आहे. तब्बल 26.34 लाख महिलांची नावे अपात्र यादीत गेली असल्याने अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे लाभ मिळतोय की नाही, याची खातरजमा करणे महत्त्वाचे आहे.
तुमचं नाव वगळलं गेलंय का? अशी करा तपासणी:
1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://ladakibahin.maharashtra.gov.in
2. तुमचं नाव, आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका
3. काही क्षणांत योजनेतील तुमचं नाव व स्थिती स्क्रीनवर दिसेल.
जर “No Record Found” असा संदेश आला, तर तुमचं नाव वगळण्यात आलं आहे.
पात्रतेचे निकष…
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखांपेक्षा कमी असावे
लाभार्थी महिला राज्यातील रहिवासी असावी
इतर योजना किंवा नोकरीद्वारे दरमहिन्याचे नियमित उत्पन्न नसावे
महिलांनी वेळेत तपासणी करून आपल्या नावाची खातरजमा करावी आणि कोणतीही अडचण असल्यास ग्रामपंचायत / महापालिका कार्यालयाशी संपर्क साधावा.
Editer Sunil thorat




