लोणी काळभोर रामदरा पुलाच्या बांधकामाला गती ; पाटबंधारे विभागाचा तातडीने आदेश…

लोणी काळभोर (ता. हवेली) : लोणी काळभोर येथील तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील नवीन मुठा उजवा कालवा यावर तब्बल ६० वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता. काळाच्या ओघात हा पूल पूर्णपणे जीर्ण झाला असून पुलाचे दगड निखळणे, लोखंडी कठडे तुटणे आणि मध्यस्तंभावर भेगा पडणे यामुळे तो कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. त्यामुळे प्रशासनाने अवजड वाहतुकीसाठी हा पूल बंद केला होता.
नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न लक्षात घेता आणि भाजप पदाधिकाऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर पुणे पाटबंधारे विभागाने नवीन पूल बांधकामाचे आदेश तातडीने दिले आहेत.
पुलाची बिकट अवस्था…
👉🏻१५ सप्टेंबर २०२५ रोजी पुलाच्या मध्य स्तंभावर मोठी भेग पडून तो अर्धवट तुटलेल्या अवस्थेत दिसला.
👉🏻पुलावरील वाहतूक झाल्यास संपूर्ण स्तंभ कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती.
👉🏻लोखंडी कठडे पूर्णपणे तुटले आहेत, तर स्तंभावरचे दगड उघडे पडले आहेत.
👉🏻या धोकादायक अवस्थेमुळे यांत्रिकी विभागाच्या मशिनरीच्या सहाय्याने पुलाच्या दोन्ही बाजूस चर मारून रस्ता पूर्ण बंद करण्यात आला आहे.
नागरिकांचा जीविताचा प्रश्न…
रामदरा परिसरातील पुल हा स्थानिकांसाठी दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे.
👉🏻पुलाच्या लगतच्या ४ ते ५ लोकवस्त्या आणि
👉🏻सुमारे २०० ते ३०० हेक्टर बागायती शेती
👉🏻तसेच प्रसिद्ध रामदरा शिवालयाकडे जाणारा मुख्य मार्ग या पुलावरून जात असल्याने नागरिकांसाठी हा जीविताचा गंभीर प्रश्न बनला होता.
भाजपचा सततचा पाठपुरावा…
नवीन पूल बांधण्यासाठी नागरिकांसोबतच भाजप पदाधिकाऱ्यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. बुधवारी (ता. २४ सप्टेंबर) सोलापूर रोड मंडळ अध्यक्ष गणेश चौधरी, नगर रोड मंडळ अध्यक्ष विजय जाचक, सरचिटणीस दत्ताभाऊ वाळके, कमलेश दत्तात्रय काळभोर आदींनी पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ व अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके यांची भेट घेऊन निवेदन दिले. यानंतर खडकवासला पाटबंधारे विभागाला रामदरा पुल निष्कासित करून नवीन पूल बांधण्याची परवानगी देण्यात आली.
रब्बी हंगामाआधी काम सुरू होणार…
पाटबंधारे विभागाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे की
👉🏻नवीन मुठा उजवा कालवा बंद कालावधी लक्षात घेऊन
👉🏻रब्बी हंगामातील सिंचन आवर्तन सुरू होण्यापूर्वी…
रामदरा पुलाचे काम क्षेत्रीय स्तरावर तात्काळ सुरू करावे.
भाजप नेते कमलेश दत्तात्रय काळभोर म्हणाले :
“पाटबंधारे विभागाचे प्रमुख अभियंता हेमंत धुमाळ व अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके यांनी १५ नोव्हेंबरपूर्वी कालवा सुरू होण्याआधी पुलाचे बांधकाम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. रखडलेल्या पुलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. या कामासाठी जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांची मोलाची मदत झाली आहे.”
थोडक्यात मुद्दे पुढीलप्रमाणे…
— ६० वर्ष जुना रामदरा पूल धोकादायक अवस्थेत.
— १५ सप्टेंबर रोजी पुलाच्या स्तंभावर मोठी भेग.
— अवजड वाहतुकीस बंद ; यांत्रिकी विभागाने रस्ता बंद केला.
— भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासन जागे.
— पाटबंधारे विभागाने नवीन पूल बांधकामाला तातडीने मंजुरी.
— रब्बी हंगामाआधी म्हणजे १५ नोव्हेंबरपूर्वी काम सुरू होणार.
Editer sunil thorat




