जिल्हामहाराष्ट्रराजकीयसामाजिक

महाराष्ट्र हादरलं! मुसळधार पावसानंतर आता पूराचं संकट, शासनानं जारी केले हेल्पलाइन नंबर

हवामान खात्याचा इशारा : मुसळधार पावसासह राज्यात पूरस्थितीची शक्यता, आपत्कालीन क्रमांक जाहीर...

मुंबई : राज्याला पावसानं झोडपून काढलं असून अनेक ठिकाणी हाहाकार माजला आहे. हवामान विभागानं पुढील २४ तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील ४८ तास राज्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू राहणार आहे.

आज हवामान विभागानं मुंबई, ठाणे, जालना, रायगड, पालघर, नाशिक आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने विशेष दक्षता घेत १७ जिल्ह्यांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केले आहेत.

१७ जिल्ह्यांचे आपत्कालीन क्रमांक :

बीड – 02442-299299
लातूर – 02382-220204
धाराशिव – 02472-227301
नांदेड – 02462-235077
परभणी – 02452-226400
सोलापूर – 0217-2731012
पुणे – 09370960061
सातारा – 02162-232349
अहमदनगर – 0241-2323844
गडचिरोली – 07132-222031
कोल्हापूर – 02312-659232
रायगड – 08275152363
रत्नागिरी – 0705722233
सिंधुदुर्ग – 02362-228847
पालघर – 02525-297474
ठाणे – 09372338827
मुंबई शहर व उपनगर – 1916 / 022-69403344

मंत्रालयातील 24/7 कार्यकेंद्र क्रमांक :
022-22027990, 022-22794229, 022-22023039, 09321587143

नागरिकांना आवाहन…

शासनाच्या वतीनं नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की, पूरस्थिती टाळण्यासाठी अति आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. पावसामुळे आधीच हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.

Editer sunil thorat

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??