भारताने पाकड्यांना ठेचले! आशिया चषक २०२५ वर तिरंगा, तिलक-शिवमची जोडी ठरली विजयानायक
भारताने पाकड्यांना ठेचले! आशिया चषक २०२५ वर तिरंगा फडकला...

दुबई : भारतीय संघाने पाकिस्तानवर पुन्हा एकदा मात करत आशिया चषक २०२५ चे जेतेपद पटकावले. केवळ २१ दिवसांत तिसऱ्यांदा पाकिस्तानी संघाचा पराभव करून भारताने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या थरारक अंतिम सामन्यात तिलक वर्मा (नाबाद ६९) आणि शिवम दुबे (३३) यांच्या जोडीने निर्णायक क्षणी खेळ उंचावला.
पहिल्यांदाच आशिया चषकाच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत-पाक सामना फायनलमध्ये झाला आणि सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने वर्चस्व गाजवले.
पाकिस्तानचा डाव – चक्रवर्ती व कुलदीपसमोर गडगडाट…
साहिबजादा फरहान (५८) व फखर जमान (४६) यांनी दमदार सुरुवात करून १८० धावांचा अंदाज दिला होता. पण, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्या फिरकीसमोर पाकड्यांची भंबेरी उडाली. पाकिस्तानचा डाव ११३/२ वरून १४६ धावांवर संपला. कुलदीप यादवने ४/३० अशी स्वप्नवत कामगिरी केली. जसप्रीत बुमराह व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
भारताची डगमगती सुरुवात…
भारताची सुरुवात मात्र निराशाजनक ठरली. आघाडीचे तीन फलंदाज – अभिषेक शर्मा (५), सूर्यकुमार यादव (८) आणि शुभमन गिल (१२) स्वस्तात बाद झाले. या वेळी संजू सॅमसन आणि तिलक वर्माने डाव सावरत ५७ धावांची भागीदारी केली. संजू २४ धावांवर बाद झाला.
तिलक-शिवमची जोडी ठरली गेमचेंजर…
४२ चेंडूंवर ६९ धावांची गरज असताना शिवम दुबे मैदानात आला आणि तिलकसोबत त्याने सामना भारताच्या बाजूला खेचला. दोघांनी ६० धावांची भागीदारी करत पाकिस्तानला बचावाच्या भूमिकेत ढकलले. अखेर सहा चेंडूंवर १० धावांची गरज असताना तिलकने षटकार ठोकून भारताला आशिया चषक जिंकून दिला.
तिलक वर्मा नाबाद ६९ (५३ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) ठरला सामनावीर. रिंकू सिंगने विजयी धाव घेत भारतीय विजयावर शिक्कामोर्तब केले.
अपराजित भारत – सलग सात सामने जिंकले…
या विजयानंतर भारताने स्पर्धेत सलग सात विजय मिळवत अपराजितपणा टिकवला. आशिया चषकाच्या इतिहासात भारताचे हे आणखी एक ऐतिहासिक यश ठरले.
Editer sunil thorat




