
पुणे (हवेली) : लोणी काळभोर, कदमवाकवस्ती हा परीसरात शहरीकरणामुळे लोकसंख्या वाढली असल्याने वाहनाची संख्या वाढणे स्वभाविक आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोठया प्रमाणात वाहतुक सुरू असते यापूर्वी या महामार्गावर ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर टोल नाका उभारण्यात आला होता. या टोल नाक्याची मुदत संपून बरेच वर्षे लोटली असल्याने टोल नाक्याच्या आजुबाजूला असलेला इतर टोलनाक्याचा परिसर रिकामा झाला परंतु ‘टोल नाका जेथे थे’ अवस्थेत उभा आहे. ‘ना लोकप्रतिनिधी ना सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष दिले नाही.
याच प्रश्नांची दखल घेऊन हनुमंत राजकुमार सुरवसे शिवसेना ठाकरे गट, हवेली तालुका उपप्रमुख व लोणी काळभोर वि.वि.का.से.स. सोसायटीचे मा. चेअरमन व विद्यमान संचालक संजयजी भालेराव यांनी कवडीपाठ टोल नाका काढण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
हवेली शिवसेना उपनेते यांची गंभीर दखल…
पुर्व हवेलीतील पुणे सोलापूर रोड, कदमवाकवस्ती, कवडीपाठ येथील बंद टोल नाकाची गंभीर दखल हनुमंत राजकुमार सुरवसे, शिवसेना ठाकरे गट, हवेली तालुका उपप्रमुख यांनी घेतली असून लोणी काळभोर वि.वि.का.से.स. सोसायटीचे मा. चेअरमन व विद्यमान संचालक संजयजी भालेराव, यांनी सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना खालील प्रमाणे निवेदन दिले.
पुणे सोलापूर हायवे महामार्ग या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतुक (वर्दळ) सुरु असते. परंतु रात्री अपरात्री कवडीपाट या हद्दीमध्ये प्रशासनाने जो टोलनाका उभा केलेला आहे तो गेली अनेक वर्षे बंद पडलेल्या अवस्थेत असून तो पुर्णपणे जिर्ण झालेला आहे. तसेच मोठ्या प्रमाणात वादळ – वारा आला तर तो टोलनाका ढासळुन जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसून दिनांक – १४ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका कार गाडीचा अपघात होऊन त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झाले असून अपघाताचे प्रमाण त्या टोलनाक्यावर होते. त्या टोलनाक्यावर मोठ मोठे सिमेंट कॉकिटचे कठडे बांधले कारणास्तव बांधलेले असून व पश्चिमेकडे जाणाऱ्या गाडया किंवा पुर्वेकडे जाणाऱ्या गाडयांचे लाईट किंवा फोकस हे ड्रायव्हरच्या डोळयावर पडते. त्यामुळे त्या भागामध्ये अपघाताचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत असून जिवीत हानी टाळण्यासाठी प्रशासनाला वारंवार टोल काढण्याची विनंती केली असता ते अदयापही दुर्लक्ष करीत आहे.
तरी शासनाला विनंती आहे कि, ते १५ दिवसांच्या आतमध्ये न काढल्यास शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे गट यांच्यावतीने त्याठिकाणी तीव्र स्वरुपाचे “रास्ता रोको आंदोलन” जोपर्यंत तो टोलनाका बाजूला हटवत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरच बसून राहणार हि प्रशासनानी नोंद घ्यावी व आमच्या निवेदन अर्जाचा विचार करुन तो टोलनाका ताबडतोब हटवण्यात यावा, असे निवेदनाद्वारे सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांना देण्यात आली आहे.
अतुल चव्हाण,
सार्वजनिक प्रादेशिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता…
या निवेदनावर प्रतिक्रिया देताना अतुल चव्हाण पुढे असे म्हणाले कि या संदर्भात प्रशासनाकडून जिर्ण अवस्थेत असलेला कवडीपाठ टोल नाका हटवण्यासाठी परवानगी मिळाली असून पुढील येणाऱ्या आठ दिवसात कवडीपाट येथील टोल नाका हटवला जाईल. असे तोंडी आश्वासन अतुल चव्हाण यांनी दिले.




