क्राईम न्युज

परिमंडळ ५ अंतर्गत काळेपडळ पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू पठाण व त्याच्या टोळीवर आणि लोणी काळभोर पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार फिरोज शेख व त्याच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई…

पुणे : काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्र. १००/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०८(२),३२९(३),३५१ (२), ३५२,१८९ (१),१८९(२),१९१ (२),६१ (२),१११ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. नमूद गुन्हयातील आरोपी क्र. १) रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (टोळीप्रमुख), वय ३४ वर्षे, व्यवसाय मसाले व्यापारी, रा. बिल्डींग ख्वाजा मंजिल, गल्ली नं. वी/५, सय्यदनगर, महंदवाडी, पुणे याचेवर जमीन खाली करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करणे, खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत व मारामारी अशा प्रकारचे पुणे शहरातील वेगवेगळया पोलीस ठाणे येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपीने त्याचे साथीदार आरोपी क्र. २) इजाज सत्तार पठाण, वय ३९ वर्षे, रा. सदर, ३) नदीम बाबर खान, वय ४१ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. स.नं. ७५, घर नं. ११४५, गल्ली नं. ए/५, सय्यदनगर, महंदवाडी, पुणे, ४) सद्दाम सलीम पठाण, वय २९ वर्षे, धंदा चिकन शॉप, रा. गल्ली नं. २१, सय्यदनगर, हडपसर, पुणे, ५) एजाज युसूफ इनामदार-पटेल, वय ३३ वर्षे, धंदा-गाडी खरेदी विक्री, रा. गल्ली नं. १९, सय्यदनगर, हडपसर, पुणे, ६) साजीद झिब्राईल नदाफ, वय २५ वर्षे, धंदा गॅरेज, रा. वेताळवावा वसाहत, स.नं. ५, हडपसर, पुणे व ७) इरफान नासीर शेख, वय २६ वर्षे, रा. गल्ली नं. १७, आयशा मस्जीदसमोर, सय्यदनगर, हडपसर, पुणे यांच्यासोबत स्वतःची टोळी तयार करुन स्वतःला तसेच संघटित टोळीला आर्थिक लाभ व्हावा व आजूबाजूच्या परीसरामध्ये आपली दहशत असावी, या उद्देशाने पुणे शहर आयुक्तालय तसेच आजूबाजूच्या जिल्हयांमध्ये गैरकायद्याची मंडळी जमवून अग्निशस्त्र, घातक शस्त्रांसह जवरी चोरी, दरोडा, खंडणी, अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करणे ई. गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे.

                      लोणी काळभोर पोलीस ठाणे…

लोणी काळभोर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्र. १६८/२०२५ भा.न्या.सं. कलम १८९ (२),१८९(३), १८९ (४),१८९ (६),३५१ (२), ३५२,३२४ (४) (५) सह शस्त्र अधिनियम कलम ४,२५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (३),१३५,१४२ सह फौजदारी (सुधारणा) कायदा कलम ३,७ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. नमूद गुन्हयातील आरोपी क्र. १) फिरोज महंमद शेख (टोळीप्रमुख), वय २९ वर्ष, रा. घोरपडे वस्ती, कदमवाक वस्ती, ता. हवेली, जि. पुणे २) प्रसाद दत्तात्रय जेठीथोर, वय २० वर्षे, रा. माळीमळा, खेडकर यांचेकडे भाडयाने, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे ३) अस्लम अन्वर शेख, वय २५ वर्षे, रा. जयहिंदनगर झोपडपट्टी, लोणी स्टेशन, कदमवाक वस्ती, ता. हवेली, जि. पुणे. ४) आदित्य प्रल्हाद काळाणे, रा. कदमवाक वस्ती, ता. हवेली, जि. पुणे व दोन विधीसंघर्षित बालक यांनी केला असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. तसेच दरम्यानच्या कालावधीमध्ये वरील आरोपींवर खुनाचा प्रयत्न, गैरकायद्याची मंडळी जमवुन दहशत करणे, घातक शस्त्राचा वापर करुन मारहाण करुन गंभीर जखमी करणे, बेकायदेशीररित्या हत्यार जवळ बाळगणे, दहशत पसरविणे इत्यादी प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सवय नमूद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (1), ३ (२).३ (४) अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे.

परिमंडळ ५ चे पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर भर देऊन शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करुन जनमानसामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत परिमंडळातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिलेले आहेत. कुख्यात गुंड व टोळी गुन्हेगार यांचे गुन्हेगारी कारवायांवर वचक बसविण्यासाठी मागील ०४ महिन्यांचे कालावधीमध्ये मोका कायद्यांतर्गत परिमंडळ ५ मध्ये सलग ६ कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा

मुख्य संपादक

"https://thepointnews24.in/ ("द पाॅईंट न्युज २४") वेब पोर्टल पुणे येथून कार्यान्वित केले जात असून याच्या माध्यमातून माहीती प्रसारित करणे या एकमेव उद्देश आहे. परंतु कोणाचीही बदनामी, अवहेलना किंवा त्रास देण्यासाठी उपयोग होत नाही. प्रतिनिधी यांच्या कडून आलेली माहिती प्रसारित करणे हा निखळ व प्रामाणिक उद्देश आहे तरीही प्रसारित केलेल्या मजूकराच्या विषयाबाबत काही वाद/तक्रार उदभवल्यास (न्याय क्षेत्र बारामती), ता. बारामती जिल्हा पुणे येथे असेल. मुख्य संपादक - श्री. सुनिल थोरात - संपर्क 7249314996, श्री. डॉ. गजानन टिंगरे - संपर्क 8411833101, कायदेशीर सल्लागार श्री. आनंद थोरात. (टिप - वार्ताहर/प्रतिनिधी यांनी वरील मो. न. वर संपर्क साधावा.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??