सुनिल थोरात (वार्ताहर)
पुणे (हडपसर) : पुणे जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) , पुणे शहर मुख्याध्यापक संघ, पुणे शहर विज्ञान व गणित अध्यापक संघ, साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनियर कॉलेज व चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालय हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षातील पुणे शहर पूर्व – पश्चिम विभाग, तालुका पातळीवरील विज्ञान प्रदर्शन साधना विद्यालय व आर. आर शिंदे ज्युनियर कॉलेज व चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालयामध्ये दि.19 डिसेंबर व २० डिसेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
या विज्ञान प्रदर्शनात पुणे शहरातील इयत्ता ६ वी ते १२ वीच्या सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक, प्रयोगशाळा परिचर व सहाय्यक यांची शैक्षणिक उपकरणे व साधन निर्मिती यांचा सहभाग असेल.
तसेच या विज्ञान प्रदर्शनात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्न मंजुषा स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय जाधव व चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालयचे प्रभारी प्राचार्य विठ्ठल तुळजापुरे यांनी दिली.
तसेच शहरातील जास्तीत जास्त शाळांनी प्रदर्शनात सहभाग घ्यावा व विज्ञानप्रेमी नागरिकांनी प्रदर्शन पाहायला यावे असे आवाहनही त्यांनी केले.
सदर कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ठीक १० वाजता एस.एम.जोशी महाविद्यालय हडपसर येथील सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे विभागीय चेअरमन आमदार चेतन तुपे पाटील, पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी डाॅ. भाऊसाहेब कारेकर, प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे प्राचार्य डाॅ.महेश शेंडकर, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य दिलीपआबा तुपे, एस.एस जोशी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सुरेश साळुंखे, विज्ञान अध्यापक संघ पुणे शहर पूर्व अनिल स्काॅट, पुणे शहर मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शिवाजी शिंदे, विज्ञान अध्यापक संघ पुणे शहर पश्चिम विभाग अध्यक्ष संजय भामरे ,विज्ञान अध्यापक संघ जिल्हाध्यक्ष रोहिदास एकाड उपस्थित राहणार आहेत.

बातमी / लेख आपल्या मित्रांसोबत शेअर करा